फोटो सौजन्य – Instagram
शनिवारी देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बहिणींनी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधली. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. मात्र, यातील एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सध्या सोशल मिडीयावर चर्चेत असलेली भारताच्या माजी खेळाडू संजय बांगर यांची मुलगी ही चर्चेचा विषय आहे. संजय बांगर याचा आधीचा मुलगा आर्यन बांगर हा आता अनया बांगर झाली आहे.
ती सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. आता सध्या तिची एक पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिने मुलगी म्हणुन पहिल्यांदाच रक्षाबंधन साजरे केले आहे. मुलापासून मुलगी झालेल्या अनायाने तिच्या भावासोबत रक्षाबंधन साजरे केले. त्यानंतर तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. अनायाची ही पोस्टही खूप वेगाने व्हायरल होत आहे.
जसप्रीत बुमराहवरील टीकेवर माजी दिग्गज संतापले! दिले चोख उत्तर; म्हणाले – आमच्या चाहत्यांची दिशाभूल…
अनायाने तिचा धाकटा भाऊ अथर्व बांगरला राखी बांधली. हा फोटो शेअर करताना अनायाने लिहिले की, हे फक्त राखी बांधणे नाही तर ते भावा-बहिणीमधील वर्षानुवर्षे प्रेम, हास्य आणि असंख्य गप्पांबद्दल आहे. अनाय सोशल मीडियावर एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिचे वडील संजय बांगर देखील माजी भारतीय क्रिकेटपटू आहेत. लिंग बदलण्यापूर्वी अनायाचे नाव आर्यन होते. तिच्या चाहत्यांमध्ये तिची एक वेगळी ओळख आहे. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
अनायाने नुकतीच स्तन वाढवणे आणि श्वासनलिकेवरील शेव्ह सर्जरी केली आहे. यातून बरे झाल्यानंतर ती पुन्हा सामान्य जीवन जगू लागली आहे. अलिकडेच ती जिममध्ये कसरत करताना दिसली. अनायाचा भाऊ अथर्व बांगर देखील तिच्यासोबत जिममध्ये दिसला. तिच्या वडिलांप्रमाणेच अनाय देखील एक क्रिकेटपटू आहे. ती अनेकदा तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते.
आर्यन मुंबईतील एका स्थानिक क्लबकडून खेळला आहे. २०१९ मध्ये, आर्यनने कूचबिहार ट्रॉफीमध्ये पुद्दुचेरीचे प्रतिनिधित्व केले आणि ५ सामन्यांमध्ये ३०० धावा केल्या. या दरम्यान, त्याने १ शतक आणि २ अर्धशतकेही झळकावली. फलंदाजीव्यतिरिक्त, आर्यनने गोलंदाजीतही हात आजमावला. तो यामध्येही यशस्वी झाला आणि आर्यनने २० विकेट्स घेतल्या. आर्यन/अनायाचे स्वप्न भारतासाठी क्रिकेट खेळण्याचे आहे. ती यासाठी कठोर परिश्रमही करत आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, ट्रान्सवुमनना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची परवानगी नाही.