फोटो सौजन्य – X (BCCI)
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली या मालिकेमध्ये भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने फक्त तीनच सामने खेळले. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. भारतासाठी खेळून तुम्हाला दोन सामन्यांमध्ये विश्रांती हवी हे पहिल्यांदाच नजरेत आले आहे. यावर आता जसप्रीत बुमराहला पुढील मालिकांमध्ये खेळवायचे की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आता दुसरीकडे मोहम्मद सीराज याने भारतीय संघासाठी पाचही सामन्यात गोलंदाजी केली आणि त्यामध्ये त्याने दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून संघाला विजय देखील मिळवून दिला.
जसप्रीत बुमराह याने तीन सामने खेळले या तीनही सामन्यांमध्ये भारताच्या संघाला विजय मिळवता आला नाही.माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्राने जसप्रीत बुमराहवर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे. नुकत्याच संपलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये बुमराह फक्त तीन कसोटी सामने खेळला, त्यानंतर काही चाहते आणि टीकाकारांनी तो संघाची पूर्ण जबाबदारी घेत नसल्याचे प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.
‘हिटमॅन’चे नाव थिएटरमध्ये घुमले, रोहित शर्माला पाहून चाहते वेडे; या व्हिडिओने घातला धुमाकूळ
बुमराहने हेडिंग्ले (लीड्स) येथे पहिली कसोटी खेळली, त्यानंतर तो लॉर्ड्स आणि मँचेस्टर येथे तिसरी आणि चौथी कसोटी खेळला. या तीन सामन्यांमध्ये त्याने १४ विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये दोन वेळा पाच विकेट्स घेतल्या. त्याने ११९.४ षटके गोलंदाजी केली आणि २६ च्या सरासरीने विकेट्स घेतल्या. तथापि, पाचव्या कसोटीत त्याला वगळण्यात आले.
खरंतर, आकाश चोप्रा (Aakash Chopra on Jasprit Bumrah) त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला, “पूर्वी लोक म्हणत होते की बुमराह हा कर्णधारपदासाठी योग्य पर्याय आहे. त्याने पर्थमध्ये चांगले कर्णधारपद भूषवले, तो रोहितच्या नेतृत्वाखाली उपकर्णधारही होता. पण आता तेच लोक म्हणत आहेत की बुमराह खेळतो तेव्हा संघ हरतो, तो जबाबदारी घेत नाही. ‘बूम बूम बुमराह’ पासून आता आमचे चाहते ‘गुमराह’ झाले आहेत. हे पाहून वाईट वाटते.”
The Hundred : SRH संघातील खेळाडू भिडले.. डेव्हिड वॉर्नर बेअरस्टोला केलं पराभुत ; वेल्श फायरचा पराभव
चोप्रा पुढे म्हणाले की, बुमराहसारखा खेळाडू पिढीतून एकदाच येतो आणि तो प्रत्येक फॉरमॅटमध्ये जगातील नंबर १ गोलंदाज आहे. ते असेही म्हणाले, “जर बुमराह फक्त तीन कसोटी सामने खेळला तर ते ठीक आहे. जर त्याच्या कामाचे व्यवस्थापन करणे आवश्यक असेल जेणेकरून तो महत्त्वाच्या सामन्यांसाठी तंदुरुस्त राहू शकेल, तर आपण ते केले पाहिजे. आपण त्याचा आदर केला पाहिजे, त्याला ट्रोल करू नये.”
यापूर्वी, बुमराहबद्दल एक धक्कादायक अहवाल समोर आला होता, त्यानुसार, जेव्हा जेव्हा बुमराह प्लेइंग-११ मध्ये असतो तेव्हा भारत जास्त सामने गमावतो. जसप्रीतसोबत खेळलेल्या ४८ कसोटी सामन्यांमध्ये भारताने २२ गमावले आणि फक्त २० जिंकले. दुसरीकडे, त्याच्याशिवाय खेळलेल्या २८ कसोटी सामन्यांमध्ये भारताने २० जिंकले. या आकडेवारीनंतर, अनुभवी खेळाडू बुमराहवर टीका करणाऱ्यांवर आपला राग काढत आहेत.