'..and because of them, his career was ruined', Prithvi Shaw revealed everything himself; you will be shocked after reading it..
Prithvi Shaw’s cricket career : जगातील महान क्रिकेटपटूंसोबत ज्याची तुलना केली जात होती तो पृथ्वी शॉ आज टीम इंडियामध्ये स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. अलिकडेच अशी बातमी समोर आली आहे की, त्याला रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई संघातून वगळण्यात आले होते. दुसरीकडे, त्याला विजय हजारे ट्रॉफीमध्ये देखील स्थान देण्यात आले नव्हते आणि आयपीएल २०२५ च्या लिलावातही त्याला कोणी खरेदी देखील केले नाही. आता तो या सर्व मुद्द्यांवर शॉ उघडपणे आपले म्हणणे मांडले आहे.
टीम इंडियासाठी पृथ्वी शॉने २०१८ मध्ये पदार्पण केले होते. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने १३४ धावांची दमदार खेळी खेळली होती. तत्कालीन प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या खेळाडूबाबत मत व्यक्त करताना म्हटले होते की, शॉमध्ये सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि वीरेंद्र सेहवागची झलक दिसून येते. परंतु, आज तो क्रिकेटच्या जगातून फार लांब जात असल्याचे दिसत आहे.
पृथ्वी शॉने नुकतीच न्यूज २४ ला मुलाखत देताना म्हटले आहे की, त्याने अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे क्रिकेटला कमी वेळ देता आला. त्याने चुकीच्या मित्रांसोबत खूप वेळ घालवला. त्याच वेळी, कुटुंबातील आजोबांच्या जाण्याने तो खूप दुःखी होता, परंतु आता तो पुन्हा कठोर परिश्रम करण्याच्या मार्गावर परतला आहे.
पृथ्वी शॉने मुलाखतीदरम्यान पुढे सांगितले की, पूर्वी तो क्रिकेटला खूप वेळ देत असायचा. तो नेटमध्ये ३-४ तास फलंदाजी करत असे, तरीही त्याला थकवा जाणवत नव्हता. यादरम्यान, त्याचा संपूर्ण दिवस हा मैदानावर जाऊ लागला होता. परंतु, लवकरच त्याचे लक्ष विचलित झाले आणि तो चुकीच्या लोकांच्या संगतीत आला आणि सारे बिघडत गेले.
हेही वाचा : Suryakumar Yadav चा हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल…अचानक काय झाले? आता मोठ्या सिरीजमधून होणार बाहेर
पृथ्वी शॉ पुढे म्हणाला की, “अनेक गोष्टी आहेत. लोकांना त्या वेगळ्या वाटू शकतात. पण मला माहित आहे नेमके काय झाले. मी समजू शकतो. मी आयुष्यात बरेच चुकीचे निर्णय घेतलेया आहेत. मी क्रिकेटला कमी वेळ देऊ लागलो. मी पूर्वी खूप सराव करायचो. जसे की, मी नेटमध्ये ३-४ तास फलंदाजी करत असे. मला फलंदाजीचा कधीच कंटाळा आला नाही. मी अर्धा दिवस मैदानावर जात असायचो. मी कबूल करतो की मी विचलित होतो.” असे शॉ म्हणाला.