फोटो सौजन्य : JioHotstar
अर्शद खान सामन्यादरम्यान तोंडावर पडला : गुजरात टायटन्सचा तेरावा सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियमवर लखनऊ सुपर जॉईंट्सविरुद्ध खेळवला जात आहे. या सामन्यात लखनऊच्या फलंदाजांनी आज गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई गेली आहे. गुजरात संघ हा आजचा सामना पहिल्या स्थानासाठी खेळत आहे. पहिल्या दोन स्थानावर जो संघ गुणतालिकेमध्ये असेल त्या संघाला दोन प्लेऑफमध्ये चान्स मिळणार आहेत. आजच्या सामन्यात मोठा अपघात होण्यापासून टळला आहे याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गोलंदाजी करताना गुजरातचा वेगवान गोलंदाज अर्शद खानचा पाय गंभीरपणे लटकला. चेंडू टाकण्यापूर्वीच अर्शदचा पाय घसरला आणि तो जोरात जमिनीवर पडला. अर्शद काही वेळ जमिनीवर बसून राहिला आणि त्याच्याकडे पाहून असे वाटले की तो खूप जखमी झाला आहे. त्याच षटकात अर्शदसोबत पुन्हा असाच एक प्रसंग घडला. सुदैवाने, गुजरातच्या या वेगवान गोलंदाजाला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. तथापि, दुसऱ्यांदा घसरल्याने अर्शद मैदानावरून खाली पडला.
फक्त 36 धावा अन् सूर्यकुमार यादव मोडणार सचिन तेंडुलकरचा विक्रम! 15 वर्षांनंतर होणार मोठा पराक्रम
गुजरात टायटन्स आणि लखनौ यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात अर्शद खान दोनदा थोडक्यात बचावला. खरं तर, डावातील दुसरे षटक टाकण्यासाठी आलेला अर्शद त्याच्या स्पेलचा पहिला चेंडू टाकणारच होता, तेव्हा त्याचा पाय घसरला. अर्शद जोरात जमिनीवर पडला आणि काही वेळ तो उठू शकला नाही. अर्शदकडे पाहून असे वाटत होते की त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. तथापि, फिजिओने तपासणी केल्यानंतर, अर्शदने पुन्हा गोलंदाजी सुरू केली. अर्शदने षटकात फक्त चार चेंडू टाकले होते तेव्हा पुन्हा एकदा त्याचा पाय घसरला. कसा तरी अर्शदने त्याचा षटक पूर्ण केला आणि लगेचच मैदानाबाहेर गेला. अर्शद किती गंभीर जखमी झाला आहे हे माहित नाही. तथापि, तो स्वतःहून मैदानाबाहेर पडला.
Arshad Khan slipped badly while landing on the crease and couldn’t even stand properly for a minute. Thankfully, he’s alright now! #IPL2025 #GTvsLSG pic.twitter.com/pfgIW1NyhB
— OneCricket (@OneCricketApp) May 22, 2025
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात चांगली झाली. हे वृत्त लिहिताना, अॅडम मार्कराम आणि मिशेल मार्श यांनी ९ षटकांत ८३ धावा जोडल्या होत्या. मार्श अतिशय आक्रमक पद्धतीने फलंदाजी करत आहे आणि त्याने त्याचे अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याच वेळी, मार्करामची बॅट देखील चांगली कामगिरी करत आहे. मार्शने फक्त ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. लखनौ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहे.