फोटो सौजन्य : IndianPremierLeague
21 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यामध्ये वानखेडेवर सामना पार पडला. या सामन्यात मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यांनी कमालीची खेळी खेळली आणि नाबाद राहिला. त्याने कालच्या सामन्यांमध्ये 43 चेंडूंमध्ये 73 धावा केल्या यामध्ये त्याने चार षटकार आणि सात चौकार मारले. त्याच्या या खेळीबद्दल त्याला या सामन्याचा सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. आता लवकरच सूर्यकुमार यादव हा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणार आहे त्यासाठी फक्त त्याला 36 धावांची गरज आहे.
आयपीएल 2025 मध्ये सूर्यकुमार यादव अशा परिस्थितीत तो सचिन तेंडुलकरचा 15 वर्ष जुना विक्रम मोडू शकतो. तो फक्त 36 धावा दूर आहे. मुंबई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमियर लीगमध्ये एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजपर्यंत सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याला क्रिकेटचा देव मानले जाते. 2010 च्या आयपीएल आवृत्तीत त्याने 15 सामन्यांमध्ये एकूण 618 धावा केल्या. या काळात सचिनने उत्कृष्ट फॉर्म दाखवला आणि पाच अर्धशतके झळकावली. त्याची फलंदाजीची सरासरी 47.53 होती आणि त्याने 132.61 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. हा विक्रम अनेक वर्षांपासून कायम आहे आणि आजपर्यंत कोणताही फलंदाज तो मोडू शकलेला नाही.
𝙋𝙡𝙖𝙮𝙤𝙛𝙛𝙨 𝙎𝙚𝙘𝙪𝙧𝙚𝙙 🔢
Did your favourite team qualify for the Playoffs? 🤔#TATAIPL pic.twitter.com/LtiXumlWdq
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2025
तथापि, 2023 मध्ये सूर्यकुमार यादव या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला. त्या हंगामात त्याने 16 सामन्यांमध्ये 604 धावा केल्या, परंतु 618 धावांचा आकडा गाठू शकला नाही. या हंगामाबद्दल बोलायचे झाले तर, यावेळीही सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. आतापर्यंत त्याने 13 सामन्यांमध्ये 583 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी 72.87 आहे आणि स्ट्राईक रेट 170 पेक्षा जास्त आहे. सूर्याला आता सचिनचा विक्रम मोडण्यासाठी फक्त 36 धावा करायच्या आहेत.
GT vs LSG : शुभमन गिल – रिषभ पंत आमनेसामने! गुजरात टायटन्सच्या संघाने जिंकले नाणेफेक, करणार गोलंदाजी
लीग टप्प्यात त्यांचा एक सामना शिल्लक आहे ज्यामध्ये ते 600 चा टप्पा ओलांडू शकतात. यानंतर, प्लेऑफ सामन्यांमध्येही हा विक्रम आपल्या नावावर करण्याची त्याला सुवर्णसंधी असेल. अशा परिस्थितीत, सूर्या सचिनचा हा जुना विक्रम मागे टाकू शकेल का हे पाहणे मनोरंजक असेल.
मुंबई इंडियन्सच्या संघाबद्दल बोलायचं झाले तर गुणतालिकेमध्ये संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे आणि आता मुंबईचा फक्त एक सामना शिल्लक आहे. कालचा सामन्यात दिल्लीच्या संघाला पराभूत करून मुंबईच्या संघाने प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे.