
Ashes series 2025: 'Saheb' devastated by Travis Head's storm in Perth! Australia thrashes England by 8 wickets
हेही वाचा : 2025 च्या अॅशेस मालिकेतील पहिल्याच षटकात आणखी एक धमाका, मिचेल स्टार्कच्या वेगाने इंग्लंडचे फलंदाज कोसळले
पर्थच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी करत सामना आपल्या खिशात टाकला. . इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत सर्वबाद १७२ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात मिचेल स्टार्कने ७ विकेट्स घेतल्या होत्या. प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलिया संघाला केवळ १३२ धावाच करता आल्या होत्या. परिणामी इंग्लंडने ४० धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात इंग्लंड संघाला पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांसमोर टिकाव धरता आला नाही. इंग्लंड संघ १६४ धावांतच गारद झाला. इंग्लंडकडून गस अॅटकिन्सनने सर्वाधिक ३७ धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाकडून बोलंडने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले.
इंग्लंडने दिलेल्या २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरेलेल्या ऑस्ट्रेलियासांगहची सुरुवात छान झाली. ट्रॅव्हिस हेडने वेदरलेडसह पहिल्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी रचली. वेदरलेड २३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मैदानात लबुशेनने आला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ चेंडूत ११७ धावांची विक्रमी भागीदारी रचली आणि विजयाकडे वाटचाल अधिक सुकर केली. हेडने आक्रमक फलंदाजी करत खळबळ उडवून दिली. हेडने अवघ्या ६९ चेंडूत शतक झळकावले. अॅशेस मालिकेतील हे दुसरं सर्वात जलद शतक ठरले आहे. याशिवाय हेडने ८३ चेंडूत १६ चौकार व ४ षटकारांसह १२३ धावांची खेळी केली आणि तो कार्सचा शिकार ठरला. तोपर्यंत ऑस्ट्रेलिया जिंकणार ही स्पष्ट झाले होते. लबुशेनने ४९ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह नाबाद ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
हेही वाचा : Ashes 2025: मिचेल स्टार्कने लिहिला इतिहास! WTC मध्ये ‘हा’ कारनामा करत बनला जगातील तिसराच गोलंदाज