मिचेल स्टार्कने लिहिला इतिहास(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : Ind vs SA 2nd Test: KL Rahul ची ‘ती’ चूक अन् बुमराह नि:शब्द! पंत आर्मीला सोसावे लागले मोठे नुकसान
इंग्लंडविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी, स्टार्कने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये १९१ बळी मिळवले होते. इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील २० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जो रूटला बाद करून त्याने त्याच्या वर्ल्ड कप क्रिकेट कारकिर्दीतील २०० वा बळी टिपला. पहिल्या डावात रूट शून्यावर माघारी गेला आणि दुसऱ्या डावात देखील स्टार्कविरुद्ध तो स्वतःचे स्थान टिकवण्यात यशस्वी तीहरला नाही. तो दुसऱ्या डावात ११ चेंडूत ८ धावा काढून बाद झाला.
ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज नाथन लायन (२१९ बळी) यांच्या नावावर वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा विक्रम नोंदवण्यात आला आहे, तर पॅट कमिन्स (२१५ बळी) दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. मिचेल स्टार्क आता या यादीत तिसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. दुसऱ्या डावात मिचेल स्टार्कने सुरुवातीपासूनच इंग्लिश फलंदाजांवर चांगलाच दबाव निर्माण करण्यात यश मिळवले आहे. त्याने पहिल्याच षटकात झॅक क्रॉलीला झेल बाद करून आपले खाते उघडले. पहिल्या डावाप्रमाणेच क्रॉलीला या डावात देखील भोपळा न फोडता माघारी पाठवले. त्यानंतर स्टार्कने जो रूट आणि त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांना बाद करून इंग्लंडचा कणा उद्ध्वस्त केला.
हेही वाचा : AUS vs ENG : जेमी स्मिथच्या विकेटवर झाला गोंधळ, सोशल मीडियावर चाहते संतापले! इंग्लंडसोबत अन्याय झाला का?
दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये २५ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथने स्टोक्सला झेलबाद करून महत्वाची विकेट काढली. पहिल्या डावात ५ बळी घेणारा स्टोक्स फलंदाजीमध्ये खास काही करू शकला नाही, त्याला ११ चेंडूत फक्त २ धावाच करता आल्या.






