Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Para Games : पोलिओवर मात, जिद्दीने गाठले यश! अशोक मलिक यांना पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

Asian Para Games : भारतीय पॅरा पॉवरलिफ्टर अशोक कुमार मलिक यांनी आयची-नागोया आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात 192 किलो वजन उचलत भारताच्या पदकतालिकेत मोलाची भर घातली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 20, 2026 | 02:50 PM
Asian Para Games : पोलिओवर मात, जिद्दीने गाठले यश! अशोक मलिक यांना पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

Asian Para Games : पोलिओवर मात, जिद्दीने गाठले यश! अशोक मलिक यांना पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

Follow Us
Follow Us:
  • आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई
  • वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओ
  • आई, मावशी आणि मित्रांची मोलाची साथ
जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य वाटणारे लक्ष्यही साध्य करता येते, हे भारतीय पॅरा पॉवरलिफ्टर अशोक कुमार मलिक यांनी दाखवून दिले आहे. आयची-नागोया आशियाई पॅरा गेम्स 2026 (Asian Para Games) मध्ये त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात 192 किलो वजन उचलत भारताच्या पदकतालिकेत मोलाची भर घातली.

अशोक यांनी पहिल्या प्रयत्नात 187 किलो वजन यशस्वीपणे उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 192 किलो वजन उचलत आपली कामगिरी उंचावली. मात्र, अखेरच्या प्रयत्नात 201 किलो वजन उचलण्यात त्यांना यश आले नाही. तरीही त्यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर त्यांनी रौप्यपदकावर नाव कोरले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई

अशोक मलिक हे 17 वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावणारे खेळाडू आहेत. त्यांनी यापूर्वीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 2022 मध्ये आशिया ओशिनिया अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकले. त्याच वर्षी हांगझोऊ आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक मिळवले. 2026 च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही त्यांनी कांस्यपदक पटकावले.

जागतिक स्पर्धांमध्येही अशोक यांनी आपली छाप पाडली आहे. 2023 मध्ये इजिप्त येथे झालेल्या पॅरा पॉवरलिफ्टिंग विश्वचषकात त्यांनी रौप्यपदक जिंकले. त्यानंतर 2024 मध्ये पटाया येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक, तर त्बिलिसी येथे झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवले.

IND vs NZ: टीम इंडियाचे न्यूझीलंडमध्ये लँडिंग, T20 सिरीजपूर्वीच चाहत्यांमध्ये क्रेझ; 3 सामन्यांचे तिकिट्स SOLD OUT

वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओ

हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील गोहाना तालुक्यात असलेल्या मिर्झापूर खेडी गावचे अशोक यांना वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी पोलिओ झाला. मात्र, या शारीरिक आव्हानामुळे त्यांनी आपली स्वप्ने सोडली नाहीत. दिल्लीमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमुळे त्यांना खेळाची प्रेरणा मिळाली. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी पॉवरलिफ्टिंगला सुरुवात केली.

2022 मध्ये आशिया ओशिनिया स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणे हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली.

Cristiano Ronaldo: रोनाल्डोच्या करिअरला लागला ब्रेक? पोर्तुगालने किती दिवसांसाठी केले निलंबित, ‘या’ कारणामुळे शिक्षा

आई, मावशी आणि मित्रांची मोलाची साथ

अशोक यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. 2020 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आईने अशोक आणि त्यांच्या भावाची जबाबदारी सांभाळली. या कठीण काळात कुटुंबीय आणि मित्रांनी त्यांना आधार दिला.

त्यांच्या मावशीने खेळातील यशासाठी आवश्यक साधनसामग्री मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे प्रशिक्षक जे. पी. सिंह यांनी त्यांना मार्गदर्शन केले, तर मित्र विक्रम सिंह मोर यांनी प्रशिक्षण आणि पोषणाशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी मदत केली.
या सर्वांच्या सहकार्यामुळे अशोक यांचा क्रीडाप्रवास अधिक बळकट झाला. आता आशियाई पॅरा गेम्समधील रौप्यपदकाने त्यांच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अशोक मलिक यांनी आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये कोणते पदक जिंकले?

    Ans: अशोक मलिक यांनी पुरुषांच्या ६५ किलो पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रकारात रौप्यपदक जिंकले.

  • Que: अशोक मलिक यांनी किती किलो वजन उचलले?

    Ans: त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात १९२ किलो वजन उचलले.

  • Que: अशोक मलिक यांचे मूळ गाव कोणते?

    Ans: अशोक मलिक हे हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील गोहाना तालुक्यातील मिर्झापूर खेडी गावचे रहिवासी आहेत.

Web Title: Ashok malik silver medal asian para games 2026 powerlifting rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Asian Para Games 2026
  • Sports

संबंधित बातम्या

Asian Para Games 2026: दीप्ती जीवनजीने जिंकले सुवर्णपदक, ४०० मीटरमध्ये बनवला रेकॉर्ड
1

Asian Para Games 2026: दीप्ती जीवनजीने जिंकले सुवर्णपदक, ४०० मीटरमध्ये बनवला रेकॉर्ड

Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत समृद्धी घाडिगावकर, प्रशांत मोरे यांची बाजी!
2

Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत समृद्धी घाडिगावकर, प्रशांत मोरे यांची बाजी!

Asian Para Games: भारताचा नादच खुळा! पहिल्याच दिवशी जिंकली 11 मेडल्स, 4 गोल्ड अन्…
3

Asian Para Games: भारताचा नादच खुळा! पहिल्याच दिवशी जिंकली 11 मेडल्स, 4 गोल्ड अन्…

भारताच्या वाघिणींचा नाद करायचा नाय! Asian Para Games मध्ये जिंकले ‘गोल्ड’ अन् ‘सिल्व्हर’, थेट..
4

भारताच्या वाघिणींचा नाद करायचा नाय! Asian Para Games मध्ये जिंकले ‘गोल्ड’ अन् ‘सिल्व्हर’, थेट..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.