Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत समृद्धी घाडिगावकर, प्रशांत मोरे यांची बाजी!

Carrom Tournament : एमआयजी क्रिकेट क्लब, वांद्रे येथे आयोजित चौथ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत महिला एकेरी गटात ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने, तर पुरुष एकेरी गटात मुंबईच्या प्रशांत मोरेने विजेतेपद पटकावले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 19, 2026 | 09:25 PM
Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत समृद्धी घाडिगावकर, प्रशांत मोरे यांची बाजी!

Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत समृद्धी घाडिगावकर, प्रशांत मोरे यांची बाजी!

Follow Us
Follow Us:
  • एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये स्पर्धा संपन्न
  • महिलांमध्ये सोनाली कुमारीला तिसऱ्या क्रमांक
  • पुरुषांमध्ये सिद्धांत वाडवलकर तिसऱ्या स्थानी
 

एमआयजी क्रिकेट क्लब, वांद्रे येथे आयोजित चौथ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत (Carrom Tournament) महिला एकेरी गटात ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने, तर पुरुष एकेरी गटात मुंबईच्या प्रशांत मोरेने विजेतेपद पटकावले.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात समृद्धीने मुंबईच्या ऐशा महम्मद साजिदचा पराभव केला. पहिला सेट 4-25 असा गमावल्यानंतर समृद्धीने जोरदार पुनरागमन करत दुसरा सेट 23-18 आणि तिसरा सेट 25-8 असा जिंकला. या विजयासह तिने स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले.

अंतिम फेरीपूर्वी समृद्धीने मुंबईच्या सोनाली कुमारीला 25-17, 4-24, 24-8 असे पराभूत केले होते. तर ऐशाने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमवर 25-16, 22-9 अशी मात केली होती. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत सोनालीने आकांक्षाला 25-1, 11-25, 18-7 असे पराभूत केले.

पुरुष गटात प्रशांत मोरे विजेता

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या प्रशांत मोरेने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरला 22-19, 25-22 असे सरळ दोन सेटमध्ये नमवून विजेतेपद मिळवले.

प्रशांतने उपांत्य फेरीत मुंबईच्या सिद्धांत वाडवलकरचा 25-13, 11-25, 25-2 असा पराभव केला होता. तर अभिजितने मुंबईच्या प्रफुल मोरेला 25-21, 18-17 असे नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात सिद्धांत वाडवलकरने प्रफुल मोरेवर 25-0, 21-23, 24-7 अशी मात केली.

IWL : 13 नोव्हेंबरपासून महिला फुटबॉलचा थरार; आठ संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस

मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण

स्पर्धेतील विजेत्यांना एमआयजी क्रिकेट क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव अमित दाणी, इनडोअर गेम्सचे सचिव निनाद बोरकर आणि ट्रस्टी केदार कलबाग यांच्या हस्ते रोख पारितोषिके, चषक आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले आणि स्पर्धेचे सहाय्यक प्रमुख पंच योगेश सावंत उपस्थित होते.

IND vs NZ: तब्बल ४ वर्षांनी टीम इंडियात कमबॅक! कीवींच्या घरात Bhuvneshwar Kumar किती प्रभावी? पाहा T20I रेकॉर्ड

💡

Frequently Asked Questions

  • Que: एमआयजी कॅरम स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले?

    Ans: ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.

  • Que: पुरुष एकेरी गटात कोण विजेता ठरला?

    Ans: मुंबईच्या प्रशांत मोरेने पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले.

  • Que: चौथी राज्य मानांकन कॅरम स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती?

    Ans: ही स्पर्धा मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये आयोजित करण्यात आली होती.

Web Title: Mig carrom tournament samruddhi ghadigaonkar prashant more winners rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • cricket
  • Ratnagiri
  • Sports

संबंधित बातम्या

Nagpur News : विदर्भाच्या गोलंदाजांचा जम्मू-काश्मीरला दणका; २६० धावांत डाव संपुष्टात, कवलप्रीतचे शतक हुकले
1

Nagpur News : विदर्भाच्या गोलंदाजांचा जम्मू-काश्मीरला दणका; २६० धावांत डाव संपुष्टात, कवलप्रीतचे शतक हुकले

WBBL मधून डार्सी ब्राउन OUT! भारत दौऱ्यात झालेली दुखापत ठरली महागात; आता पुढे काय?
2

WBBL मधून डार्सी ब्राउन OUT! भारत दौऱ्यात झालेली दुखापत ठरली महागात; आता पुढे काय?

Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत सोनाली कुमारी, आकांक्षा कदमची उपांत्य फेरीत धडक
3

Carrom Tournament : एमआयजी कॅरम स्पर्धेत सोनाली कुमारी, आकांक्षा कदमची उपांत्य फेरीत धडक

Leopard: कोंबड्यांच्या खोलीत होता बिबट्या! रात्रभर फडशा पाडला अन् दरवाजा उघडताच…; मृत्यूचा थरार
4

Leopard: कोंबड्यांच्या खोलीत होता बिबट्या! रात्रभर फडशा पाडला अन् दरवाजा उघडताच…; मृत्यूचा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.