Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025: 6, 6, 6, 4…54 धावांचा पाऊस, 4 मेडन ओव्हर देणाऱ्या बॉलर्सची आशिया कपमध्ये वळली बोबडी

२०२५ च्या आशिया कपमध्ये, अफगाणिस्तानच्या अझमतुल्ला उमरझाईने आयुष शुक्लाच्या एकाच षटकात जबरदस्त धावा केल्या आहेत. एकेकाळी आयुषने ४ मेडन षटके टाकली होती, मात्र आता त्याची बोबडी वळली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 09, 2025 | 11:32 PM
अफगाणिस्तान विरूद्ध हाँगकाँगमध्ये झंझावात (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

अफगाणिस्तान विरूद्ध हाँगकाँगमध्ये झंझावात (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • आशिया कप २०२५ ला सुरूवात 
  • अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँगचा पहिला सामना
  • हाँगकाँगला धुतले 
आशिया कप २०२५ च्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान संघ हाँगकाँगचा सामना करत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर अफगाणिस्तान संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. या सामन्यात सर्वांच्या नजरा हाँगकाँगच्या वेगवान गोलंदाज आयुष शुक्लावर होत्या. ज्याने अलीकडेच चार मेडन ओव्हर टाकून विश्वविक्रम प्रस्थापित केला. पण या सामन्यात तो वाईट पद्धतीने पराभूत झाला. 

अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंनी आयुष शुक्लाच्या बॉलिंगवर अक्षरशः धावांचा पाऊस पाडला असल्याचे दिसून आले. इतकंच नाही तर अझमतुल्लाहने लागोपाठ ३ सिक्सर्स मारत साफ फडशा पाडला. 

सलग तीन षटकार

आयुष शुक्लाचा टी२० मध्ये सलग चार मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम असू शकतो, परंतु अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो वाईट पद्धतीने पराभूत झाला. विशेषतः त्याच षटकात, अझमतुल्लाह उमरझाईने त्याला सलग तीन षटकार मारले. आयुष शुक्लाने अफगाणिस्तानच्या डावातील १९ वे षटक टाकले. या षटकाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर अजमतुल्लाह उमरझाईने तीन लांब षटकार मारले. त्याच वेळी, त्याने चौथ्या चेंडूवर जोरदार चौकार मारला.

Asia cup 2025 : अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; हाँगकाँगसमोर ‘पठाणी’ फालदाजांचे आव्हान

५० पेक्षा जास्त धावा दिल्या

या सामन्यात आयुष शुक्लाने त्याच्या ४ षटकांच्या कोट्यात ५० पेक्षा जास्त धावा दिल्या. त्याने ४ षटकांच्या कोट्यात ५४ धावा दिल्या आणि २ बळी घेतले. त्याच्या खराब स्पेलमुळे अफगाणिस्तानने ६ विकेट्स गमावत १८८ धावा केल्या. त्यामुळे हाँगकाँगचा संघ अफगाणिस्तानला कमी धावसंख्येवर रोखू शकला नाही.

४ मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम

हाँगकाँगचा क्रिकेटपटू आयुष शुक्लाने टी२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला. आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेत मंगोलियाविरुद्ध खेळताना त्याने चार मेडन ओव्हर टाकल्या. असा पराक्रम करणारा तो जगातील तिसरा आणि आशियातील पहिला गोलंदाज ठरला. २१ वर्षीय आयुषने या सामन्यात एक विकेटही घेतली. त्या सामन्यात हाँगकाँगने मंगोलियाला फक्त १७ धावांवर बाद केले आणि सामना ९ विकेट्सने जिंकला.

AFG vs HK Asia Cup Live Score Update: उमरजईची वादळी खेळी! अफगाणिस्तानने हॉन्ग कॉन्गसमोर ठेवले 189 धावांचे लक्ष्य

अझमतुल्लाहची खेळी 

Azmatullah Omarzai has lift off at Asia Cup 2025 🚀 Watch #AFGvHKC, LIVE NOW on the Sony Sports Network TV Channels & Sony LIV.#SonySportsNetwork #DPWorldAsiaCup2025 #ACCMensAsiaCup2025 pic.twitter.com/0Qp3zEXpYK — Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 9, 2025

FAQs (संबंधित प्रश्न) 

प्रश्न १. आशिया कप २०२५ कधी सुरू?

आशिया कप ९ सप्टेंबरपासून सुरू झालाय

प्रश्न २. आशिया कप २०२५ कुठे आयोजित केला जात आहे?

आशिया कप २०२५ चा यजमान देश दुबई आणि अबूधाबी आहे.

प्रश्न ३. आशिया कप २०२५ मध्ये किती संघ खेळतील?

भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ/क्वालिफायरसह एकूण ६ संघ सहभागी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Asia cup 2025 afg vs honkong azamatullah omarzai smashed 3 sixes to ayush shukla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 11:32 PM

Topics:  

  • Asia Cup
  • Asia cup 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.