Afghanistan won the toss and elected to bat first : आजपासून आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात आज अबू धाबी येथील शेख जायद क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8.00 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या वेळी आशिया कप टी 2025 स्वरूपात खेळली जात आहे. या सामन्यापूर्वी अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर हाँगकाँग गोलंदाजांनासमोर रशीद खान आर्मीच्या फलंदाजांचे आव्हान असणार आहे.अफगाणिस्तानची धुरा रशीद खान संनभाळणार आहे तर हाँगकाँगचे नेतृत्व यासिम मुर्तझा करत आहे.
नणेफेक जिंकल्यावर अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “आम्हाला प्रथम फलंदाजी करायची असून असे दिसून येत आहे की, धावा करण्यासाठी चांगली विकेट आहे, बोर्डवर मोठी धावसंख्या ठेवल्याने गोलंदाजांना चांगली मदत मिळेल. टी-२० मध्ये तुम्ही नाणेफेक जिंकला किंवा नाही हे महत्त्वाचे नसून मधल्या वेळेत विकेट घेण्याची सर्वोत्तम संधी तुम्हाला स्वतःला द्यावी लागत असते.”
नाणेफेक गमावाणाऱ्या हाँगकाँगच्या कर्णधाराने म्हटले की तो प्रथम गोलंदाजी करण्यास इच्छुक आहे. तो गोलंदाजी करण्यासाठी आनंदी आहे. तो पुढे म्हणाला की, “आम्ही येथे पोहोचण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. आम्ही पात्रता फेरीत चांगले क्रिकेट खेळलो आहोत. कर्णधार म्हणून मी मोठ्या व्यासपीठावर आमचा कल्हण चल्लू कशी कामगिरी करणार आहे? हे पाहण्यास खूप उत्सुक आहे.”
अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात एकूण 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये अफगाणिस्तानने 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून तर हाँगकाँगने 2 सामन्यात यश प्राप्त केले आहे. आकडेवारीवरून स्पष्ट होते की, अफगाणिस्तानचा दबदबा राहिला आहे.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11
हाँगकाँग संघ : झिशान अली (यष्टीरक्षक), बाबर हयात, निजाकत खान, अंशुमान रथ, मार्टिन कोएत्झी, यासिम मुर्तझा (कर्णधार), एजाज खान, नसरुल्ला राणा, एहसान खान, अली हसन, अतीक इकबाल, कल्हण चल्लू, आयुष शुक्ला, किंचित शाह, मोहम्मद वाहिद, शाहिद वासिफ आणि मोहम्मद गजनफर.
अफगाणिस्तान संघ: रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), सेदिकुल्ला अटल, इब्राहिम जाद्रान, दरविश रसूली, अजमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जन्नत, राशिद खान (कर्णधार), नूर अहमद, एएम गजनफर, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, मोहम्मद इशाक, शराफुद्दीन अशरफ आणि गुलबदीन नायब.
बातमी अपडेट होत आहे.