AFG (Photo Credit- X)
AFG vs HK Asia Cup 2025: आजपासून आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात आज अबू धाबी येथील शेख जायद क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या वेळी आशिया कप टी 2025 स्वरूपात खेळली जात आहे. दरम्यान, अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताने हाँगकाँगसमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
First 15 overs: 110 runs
Last 5 overs: 78 runs 🔥A trademark Afghanistan innings!#AFGvHK SCORECARD 👉 https://t.co/eo5GtCWQob pic.twitter.com/xpgEZd4CDL
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 9, 2025
अफगाणिस्तानची सुरुवात वेगवान असली तरी काहीशी डगमगलेली होती. सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज़ 8 आणि इब्राहिम झदरान 1 लवकर बाद झाले. मात्र, त्यानंतर युवा फलंदाज सदीकुल्लाह अतलने संघाचा डाव सावरला. त्याने 52 चेंडूंत नाबाद 73 धावांची शानदार खेळी केली, ज्यात 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. त्याच्या संयमी आणि आक्रमक फलंदाजीने संघाच्या मधल्या फळीला मोठा आधार दिला.
मधल्या फळीत अझमतुल्लाह उमरजईने तुफानी अंदाजात फलंदाजी केली. त्याने अवघ्या 21 चेंडूंत 53 धावा ठोकल्या, ज्यात 5 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. उमरजईची ही आक्रमक खेळी हॉंगकाँगच्या गोलंदाजांवर भारी पडली आणि अफगाणिस्तानचा स्कोर 180 च्या पार पोहोचला. अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबीनेही 26 चेंडूंत 33 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
हॉंगकाँगकडून गोलंदाजी करताना एहसान खान सर्वात किफायतशीर ठरला. त्याने 4 षटकांत फक्त 28 धावा देत 1 बळी घेतला. तर किंचित शाहने 3 षटकांत 24 धावा खर्च करून 2 बळी घेतले. आयुष शुक्लानेही 2 बळी मिळवले, पण तो खूप महागडा ठरला, त्याने 4 षटकांत 54 धावा दिल्या. अफगाणिस्तानने केलेल्या या मजबूत फलंदाजीमुळे हॉंगकाँगला विजयासाठी 189 धावांचे मोठे आणि आव्हानात्मक लक्ष्य मिळाले आहे.