Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : Liton Das ने बांगलादेशच्या क्रिकेट इतिहासात उडवली खळबळ! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज 

आशिया कप २०२५ मध्ये ११ सप्टेंबर रोजी बांगलादेशने हाँगकाँगचा ७ विकेट्सने पराभव केला. या विजयाचा हीरो ठरलेल्या कर्णधार लिटन दासने बांगलादेशकडून  इतिहास घडवला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 12, 2025 | 04:21 PM
Asia Cup 2025: Liton Das creates history for Bangladesh cricket! He became the first batsman to achieve this feat

Asia Cup 2025: Liton Das creates history for Bangladesh cricket! He became the first batsman to achieve this feat

Follow Us
Close
Follow Us:
  • आशिया कप २०२५ मध्ये तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने होङ्गकोंगला धूळ चारली 
  • या सामन्यात कर्णधार लिटन दासने विजयी अर्धशतक ठोकले
  • कर्णधार लिटन दास बांगलादेशकडून सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू ठरला 

Bangladesh vs Hong Kong : आशिया कप २०२५(Asia cup 2025)मध्ये गुरुवारी (११ सप्टेंबर) तिसरा सामना बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात  खेळला गेला. अबू धाबी येथेल मैदानावर हा सामना पार पडला. या सामन्यात बांगलादेशने हाँगकाँगचा ७ विकेट्सने पराभव केला. कर्णधार लिटण दास बांगलादेशच्या विजयाचा खरा हीरो ठरला. धावांचा पाठलाग करताना लिटन दासने १५१.२८ च्या स्ट्राईक रेटने ३९ चेंडूत ५९ धावांची वादळी अर्धशतकी खेळी साकारली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि १  षटकार मारला. या सामन्यात त्याला  ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून देखील निवडण्यात आले.

हेही वाचा : Asia cup 2025 : लिटन दास आर्मीने उडवला हाँगकाँगचा धुव्वा! ११ वर्षापूर्वीचा ‘तो’ हिशोब केला चुकता..

लिटन दासने लिहिला इतिहास

लिटन दासने हाँगकाँगविरुद्ध शानदार खेळी करून मोठी कामगिरी केली आहे. लिटन दास आता  टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा बांगलादेशचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. गेल्या सामन्यापूर्वी तो महमुदुल्लाह रियाद (७७) सह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर विराजमान होता. पण आता त्याने महमुदुल्लाहला पिछाडीवर टाकत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा बांगलादेशचा पहिला खेळाडू बनण्याचा मान पटकवला.

इतकेच नाही तर लिटन दासने बांगलादेशसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्याबाबत महमुदुल्लाहला देखील मागे टाकले आहे.  महमुदुल्लाहने २००७ ते २०२४ कालावधीत बांगलादेशकडून १४१ सामन्यांच्या १३० डावांमध्ये २४४४ धावा फटकावल्या आहेत. त्याच वेळी, दासकडे आता १११ सामन्यांच्या १०९ डावांत २४९६ धावा जमा आहेत. आता बांगलादेशसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो आता फक्त शाकिब अल हसन (२५५१) च्या मागे आहे.

बांगलादेशकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

  1. लिटन दास -७८ 
  2. महमुदुल्लाह -७७ 
  3. सौम्या सरकार -५५ 
  4. शाकिब अल हसन-५३  
  5. तमीम इक्बाल -४४ – 

हेही वाचा : Duleep Trophy Final सामन्यात मध्य झोनच्या रजत पाटीदारचा शतकी तडाखा! भारतीय संघात परतण्याची आशा बळावली

बांगलादेशचा हाँगकाँगवर शानदार विजय

आशिया कपमधील तिसऱ्या सामन्याच्या निकालाबद्दल सांगायचे झाले तर, अबू धाबीमध्ये नाणेफेक जिंकून बांगलादेशने गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर हाँगकाँग प्रथम फलंदाजीसाठी मैदान्त उतरला. हाँगकाँग संघ २० षटकांत सात गडी गमावून १४३ धावाच करू शकला. हाँगकाँगकडून निजाकत खानने ४० चेंडूत ४२ धावांची सर्वाधिक धावा केल्या. तर बांगलादेशकडून तन्झिम हसन साकिबने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात कर्णधार लिटन दासच्या ३९ चेंडूत ५९ धावांच्या जोरावर बांगलादेशने हाँगकाँगचा ७ विकेट्सने विजय मिळवला.

Web Title: Asia cup 2025 liton das creates history by hitting most sixes for bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 04:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.