रजत पाटीदार(फोटो-सोशल मीडिया)
Duleep Trophy Final Central Zone vs South Zone : दुलीप ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामन्यात मध्य झोन आणि दक्षिण झोन आमनेसामने उभे आहेत. मध्य झोनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. संघाला निर्णय चांगलाच फायदेशीर ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण झोन पहिल्या डावात १४९ धावांतच गारद झाला. मध्य विभागाकडून गोलंदाजी करताना सरांश जैनने आणि कुमार कार्तिकेय यांनी मिळून ९ गडी बाद केले. धावांचा पाठलाग करणाऱ्या मध्य झोनचा कर्णधार रजत पाटीदारने शतक ठोकले आहे. या शतकासह त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दावा ठोकला आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : लिटन दास आर्मीने उडवला हाँगकाँगचा धुव्वा! ११ वर्षापूर्वीचा ‘तो’ हिशोब केला चुकता..
दक्षिण विभाग आणि मध्य विभाग यांच्यातील अंतिम सामना ११ सप्टेंबरपासून बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यावर मध्य झोनने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. पहिल्या दिवशी मध्य झोनच्या गोलंदाजांनी दक्षिण झोनला फक्त १४९ धावांत गुंडाळले. त्यानंतर मध्य विभागाच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजीचे दर्शन घडवले.
मध्य झोनचा कर्णधार रजत पाटीदारने ११२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने १२ चौकार आणि २ षटकार ठोकले. यासह, प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पाटीदारचे हे १५ वे शतक ठरले आहे. तथापि, पाटीदार शतक ठोकल्यानंतर माघारी परतला. रजत पाटीदारने ११५ चेंडूंचा सामना करत १०१ धावा केल्या. यामध्ये त्याने १२ चौकार आणि २ षटकार लगावले.
दुलीप ट्रॉफीमध्ये रजत पाटीदारने आपल्या शानदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. रजत पाटीदारने आतापर्यंत एकूण ४ डावामध्ये फलंदाजी केली आहे. ज्यामध्ये त्याने एकूण ३६९ धावा फटकावल्या आहेत. या हंगामात दुलीप ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये तो पहिल्या स्थानावर विराजमान आहे.
पहिल्या दिवशी दक्षिण झोनला १४९ धावांवर गुंडाळल्यावर प्रतिउत्तरात मध्य झोनने पहिल्या दिवशी एकही गडी न गमावता ५० धावा केल्या होत्या. मध्य विभागाकडून दानिश मालेवार आणि अक्षय वाडकर यांनी डावाची सुरवात करून. या दोघांनी एकही बळी न गमावता ५० धावांची भागीदारी रचली होती.