 
        
        बांगलादेश वि हाँगकाँग सामना(फोटो-सोशल मीडिया)
Bangladesh vs Hong Kong : आशिया कप २०२५ स्पर्धेतील तिसरा सामना काल बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात कर्णधार लिटन दास (३९ चेंडूत ५९ धावा) च्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने हाँगकाँगचा ७ विकेट्सने पराभव केला. या विजयासह बांगलादेशने पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय विजय मिळवला आहे. हा सामना गुरुवारी शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला तर हाँगकाँग संघाने प्रथम फलदाजी केली. हाँगकाँग संघाने ७ विकेट्स गमावून बांगलादेशसमोर १४३ धावा उभ्या केल्या. हाँगकाँगकडून निजाकत खानने सर्वाधिक ४२ धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून तन्झिम हसन साकिबने शानदार गोलंदाजी करत २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात कर्णधार लिटन दासच्या ३९ चेंडूत ५९ धावांच्या जोरावर बांगलादेशने हाँगकाँगचा ७ विकेट्सने विजय मिळवला.
बांगलादेशने या विजयासह ११ वर्ष जुना बदला घेतला आहे. २०१४ च्या आशिया कपमध्ये हाँगकाँगने बांगलादेशचा पराभव केला होता. बांगलादेशसाठी हा मोठा धक्का होता. हाँगकाँगच्या या विजयाने क्रीडा जगतात आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. २०१४ च्या आशिया कपमधील पराभव बांगलादेशच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. आशिया कप २०२५ मध्ये बांगलादेश ७ विकेट्सने हाँगकाँगला पराभूत करत आपला बदला घेतला आहे.
हाँगकाँग संघ खालीलप्रमाणे
हाँगकाँग (प्लेइंग इलेव्हन): झीशान अली (यष्टीरक्षक), अंशुमन रथ, बाबर हयात, निजाकत खान, कल्हान छल्लू, किंचिन शाह, यासीम मुर्तझा (कर्णधार), एजाज खान, एहसान खान, आयुष शुक्ला, अतिक इक्बाल
बांगलादेश संघ खालीलप्रमाणे
बांग्लादेश (प्लेइंग इलेव्हन): परवेझ हुसेन इमॉन, तन्झिद हसन तमीम, लिटन दास (यष्टीरक्षक/कर्णधार), तौहीद हृदोय, शमीम हुसैन, झकर अली, महेदी हसन, रिशाद हुसेन, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान
भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सरावाला सुरुवात करण्यात आली आहे. रोहित शर्मा गेल्या काही काळापासून भारताचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासोबत सराव करताना दिसून येत आहे. रोहित शर्माने ११ सप्टेंबर रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो नेटमध्ये फलंदाजी करताना दिसून येत आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे, जिथे ते तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळवण्यात येणार आहे.






