BAN vs PAK: Pakistani batsmen's hara-kiri; Bangladesh set a target of 136 runs; Taskin Ahmed shines
BAN vs PAK : आशिया कपमध्ये आज २५ सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर सुपर ४ सामना खेळला जात आहे. नाणेफेक गमावणाऱ्या पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्स गमावून बंगालदेशसमोर १३६ धावांचे आव्हान ठेवले आहे. पाकिस्तानकडून मोहम्मद हारिसने सर्वाधिक धावा ३१ केल्या आहेत. तर बांगलादेशकडून तस्किन अहमदने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आहेत. बांगलादेश संघाला आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश करायचा असेल तर १३६ धावा कराव्या लागणार आहेत.
सुपर ४ सामन्यात बांगलादेश आणि पाकिस्तान आमनेसामने उभे आहेत. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरू असणाऱ्या या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार झाकीर अलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर पाकिस्तान संघाला फलंदाजील आमंत्रित केले. झाकीर अलीचा हा निर्णय बांगलादेशच्या गोलंदाजांनी सार्थकी करून दाखवला. पाकिस्तान संघाची सुरवात खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान स्कोअर बोर्डवर ४ धावा असताना बाद झाला. त्याला तस्किन अहमदने ४ धावांवर माघारी पाठवले. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये सैम अयुब भोपळा न फोडता माघारी गेला. त्याला महेदी हसने आपली शिकार बनवले.
त्यानंतर फखर झमान आणि कर्णधार सलमान अली आगा यांनी डाव संभाळण्याचा प्रयत्न केला परंतु, फखर झमान १३, सलमान अली आगा १९ धावा, हुसैन तलत ३ धावा, शाहीन शाह आफ्रिदी १९, मोहम्मद हारिस ३१, मोहम्मद नवाज २५ धावा काढून बाद झाले तर हरिस रौफ ३ आणि फहीम अश्रफ १४ धावा काढून नाबाद राहिले. बांगलादेशकडून तस्किन अहमदने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या तर रिशाद हुसेन आणि महेदी हसन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आणि मुस्तफिजुर रहमानने १ विकेट घेतली.
आजचा सामना बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. आजचा सुपर ४ सामना जो जिंकेल टो अंतिम सामन्यात पोहचणार आहे तर पराभूत संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.
पाकिस्तान : साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.
बांगलादेश : सैफ हसन, परवेझ हुसेन इमॉन, तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, झाकीर अली (यष्टीरक्षक/कर्णधार), नुरुल हसन, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान. महेदी हसन,तस्किन अहमद,