आर आश्विन(फोटो-सोशल मीडिया)
Ravichandran Ashwin created history : भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी देखील त्याने एक इतिहास रचला आहे. अश्विन बिग बॅश लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू बनणार आहे. आगामी २०२५-२६ हंगामासाठी अश्विनचा सिडनी थंडर संघात समावेश करण्यात आला आहे.
तमिळनाडूचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने १८ डिसेंबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तसेच त्याने २७ ऑगस्ट रोजी आयपीएलमधून देखील निवृत्ती घोषित केली. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने सांगितले की त्याला जगभरातील सर्व लीगमध्ये क्रिकेट खेळायचे आहेत. आर आश्विन आता सिडनी थंडरमध्ये सामील झाला आहे. त्यानंतर तो जगभरातील अधिक लीगमध्ये खेळण्यास उत्सुक आहे.
हेही वाचा : IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम
सिडनी थंडरने अश्विनला उद्धृत करताना म्हटले की, थंडर संघाने माझ्यासाठी त्यांच्या योजना स्पष्ट केल्या असून त्यावर विश्वास देखील दाखवला आहे. संघ नेतृत्वासपबत माझी खूप चांगली चर्चा झाली आणि आम्ही सर्वजण माझ्या भूमिकेबद्दल पूर्णपणे एकाच विचारसरणीचे अस्लयचे त्याने म्हटले आहे. मला डेव्हिड वॉर्नरचा खेळ आवडतो आणि तुमच्या दृष्टिकोनाशी जुळणारा नेता असण्यापेक्षा चांगले काहीही नाही. मी सिडनी थंडरसाठी खेळण्यास उत्सुक आहे.
सिडनी थंडरचे महाव्यवस्थापक ट्रेंट कोपलँड यांनी प्रतिक्रिया दिली की, “मला खूप अभिमान आहे की अश्विनने सिडनी थंडर संघाची निवड केली आहे. आम्ही पहिल्यांदाच बोललो तेव्हापासून, अश्विनने त्याच्या आवडीने, जिंकण्याची इच्छा आणि आमच्या क्लबच्या अद्वितीय मूल्यांबद्दलच्या त्याच्या समजुतीने थंडरमधील सर्वांना प्रभावित केले आहे. आर आश्विन स्पर्धेच्या मध्यभागी नवीन ऊर्जा आणि जागतिक दर्जाच्या गोलंदाजीचा भर घालेल आणि एक नेता आणि मार्गदर्शक म्हणून त्याची उपस्थिती आमच्या संघातील तरुण खेळाडूंसाठी अमूल्य असणार आहे.”
आर अश्विनची क्रिकेट कारकीर्द
आर अश्विनने आतापर्यंत एकूण ३३३ टी-२० सामने खेळलेले आहेत. या दरम्यान त्याने ३१७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने फलंदाजीमध्ये देखील आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, त्याने १२३३ धावा केल्या आहेत. तो आयपीएलमध्ये एकूण पाच संघांकडून खेळला आहे. आर अश्विनने चेन्नई सुपर किंग्जमधून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
हेही वाचा : Asia cup 2025 : अंतिम सामन्यात IND-PAK यांच्यात रंगणार थरार! ‘हे’ समीकरण घडवणार महामुकाबला…
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, आर अश्विनने भारतासाठी ६५ सामने खेळलेले आहेत, ज्यामध्ये ७२ फलंदाजांना माघारी पाठवले आहेत. या काळात त्याने १९ डावांमध्ये १८४ धावा देखील काढल्या आहेत. तो २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा देखील भाग राहिला आहे.