Pakistan vs Oman: Pakistan won the toss and decided to bat; Will Oman show their mettle in the innings?
Pakistan vs Oman : आशिया कप २०२५ स्पर्धेत आतापर्यंत ३ सामने खेळवण्यात आले आहेत. आज १२ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि ओमान या दोन संघात आमनासामना होणार आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ओमान संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरणार आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानसाठी ओमानविरुद्ध आजचा सामना हा सराव सामना असणार आहे. त्यामुळे सलमान आगा आर्मी हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर जतिंदर सिंहच्या नेतृत्वाखालील ओमान संघ देखील आपली प्रतिभा दाखवून देण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. ओमान संघ आज आशिया कप २०२५ स्पर्धेत पदार्पण करत आहे. यावेळी संघावर नक्कीच दबाव असणार आहे. पदार्पणातच विजय मिळवण्याचे ओमान संघाचे लक्ष्य असणार आहे.
पिच रिपोर्ट
दुबईमध्ये यापूर्वी भारत आणि यूएई यांच्यात सामना खेळला गेला आहे या सामन्यात जास्त धावा होऊ शकल्या नाहीत. गोलंदाजांनी या मैदानावर आपले वर्चस्व गाजवले आहे. २००९ पासून आतापर्यंत दुबई क्रिकेट स्टेडियमवर टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात येत आहेत. आतापर्यंत येथे ९४ टी-२० सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४६ सामन्यात विजय मिळवला आहे तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने ४८ सामन्यात बाजी मारली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या मैदानावर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १४४ इतकी आहे. आजच्या हवामानाबाबत सांगायचे झाले तर दुबई येथे पावसाची शक्यता नाही. हवामान उष्ण राहणार आहे.
हेही वाचा : IND-PAK सामन्याला माजी क्रिकेटपटूचा जोरदार सपोर्ट! म्हणाला.,”या सामन्याला राजकारणापासून दूर..
ओमान संघ खालीलप्रमाणे
जतिंदर सिंह (कर्णधार), हम्माद मिर्जा, विनायक शुक्ला (विकेटकीपर), सुफियान यूसुफ (विकेटकीपर), आशीष ओडेदरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफियान महमूद, आर्यन बिष्ट, करण सोनावले, जिक्रिया इस्लाम, हसनैन अली शाह, फैजल शाह, मोहम्मद इमरान, नदीम खान, शकील अहमद आणि समय श्रीवास्तव.
सलमान अली आगा (कर्णधार),अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हारिस रऊफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सईम अयूब, सलमान मिर्जा, शाहीन आफ्रिदी, सुफियान मोकिम.