
IND vs PAK, T20 World Cup 2026: "This is our decision..." The Pakistan captain made a big revelation regarding the boycott against India.
Statement by Pakistan captain Salman Ali Agha : पाकिस्तानी क्रिकेट संघाने भारताविरुद्धच्या आगामी पुरुष टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकला आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर आमनेसामने येणार होते. परंतु, आता हा सामना होऊ शकणार नाही. तसेच पाकिस्तान सरकारकडून काही अटींसह पाकिस्तान संघाला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या निवेदनात या निर्णयाचे कारण स्पष्ट करण्यात आले नसले तरी असे मानले जाते की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बांगलादेशला समर्थन दर्शविण्यासाठी भारताविरुद्धच्या विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकला आहे.
दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने पाकिस्तान सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. सलमान अली आघाला याप्रकरणी विचारले असता, पाकिस्तानी कर्णधार आघा म्हणाला की, “संघ सरकार आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या कोणत्याही सूचनांचे पालन करणार. आम्ही विश्वचषकात जाणार आहोत. हा आमचा निर्णय नसून आम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही. भारताविरुद्ध न खेळणे हा आमचा निर्णय नव्हता, म्हणून आम्ही त्याबद्दल काही देखील करू शकत नाही. आमचे सरकार आणि पीसीबी प्रमुख आम्हाला जे काही करण्यास सांगतील ते आम्ही करू.”
सलमान अली आघा यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी भारत, नामिबिया, नेदरलँड्स आणि अमेरिकेसह गट अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तानी संघ ७ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये नेदरलँड्सविरुद्ध पहिला सामना खेळून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
सुरक्षेच्या कारण देत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्यांचे विश्वचषक सामने आयसीसीकडे भारतातून दुसरीकडे हलविण्याची विनंती केली होती, परंतु आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली. परिणामी, बांगलादेशला पुरुषांच्या टी२० विश्वचषकातून बाहेर करण्यात आले. आता बांग्लादेश संघाच्या जागी स्कॉटलंडला गट क मध्ये स्थान देण्यात आले आहे.
पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यात लिहिले आहे की, “पाकिस्तानच्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकारने २०२६ च्या टी२० विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सहभागाला मान्यता दिली आहे, परंतु पाकिस्तान क्रिकेट संघ १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरणार नाही.”
हेही वाचा : T20 World Cup 2026 आधी श्रीलंकेला घरच्या मैदानावर इंग्लडसमोर टेकावे लागले गुडघे! मालिका गमावली अन्…
तथापि, पाकिस्तान त्यांचा अंतिम निर्णय एक दिवस आधी जाहीर केला, ज्यामुळे स्पर्धेसाठी एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. कारण हाय-व्होल्टेज भारत-पाकिस्तान सामना हा अधिक उत्पन्न मिळवून देत आयाला आहे. पाकिस्तानकडून पुरुषांच्या टी२० विश्वचषकासाठी संघाच्या जर्सीचे लाँचिंग देखील पुढे ढकलण्यात आले.