लिटन दास(फोटो-सोशल मीडिया)
Bangladesh vs Hong Kong : आशिया कप २०२५(Asia cup 2025)मध्ये गुरुवारी (११ सप्टेंबर) तिसरा सामना बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात खेळला गेला. अबू धाबी येथेल मैदानावर हा सामना पार पडला. या सामन्यात बांगलादेशने हाँगकाँगचा ७ विकेट्सने पराभव केला. कर्णधार लिटण दास बांगलादेशच्या विजयाचा खरा हीरो ठरला. धावांचा पाठलाग करताना लिटन दासने १५१.२८ च्या स्ट्राईक रेटने ३९ चेंडूत ५९ धावांची वादळी अर्धशतकी खेळी साकारली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि १ षटकार मारला. या सामन्यात त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून देखील निवडण्यात आले.
हेही वाचा : Asia cup 2025 : लिटन दास आर्मीने उडवला हाँगकाँगचा धुव्वा! ११ वर्षापूर्वीचा ‘तो’ हिशोब केला चुकता..
लिटन दासने हाँगकाँगविरुद्ध शानदार खेळी करून मोठी कामगिरी केली आहे. लिटन दास आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा बांगलादेशचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. गेल्या सामन्यापूर्वी तो महमुदुल्लाह रियाद (७७) सह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर विराजमान होता. पण आता त्याने महमुदुल्लाहला पिछाडीवर टाकत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा बांगलादेशचा पहिला खेळाडू बनण्याचा मान पटकवला.
इतकेच नाही तर लिटन दासने बांगलादेशसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्याबाबत महमुदुल्लाहला देखील मागे टाकले आहे. महमुदुल्लाहने २००७ ते २०२४ कालावधीत बांगलादेशकडून १४१ सामन्यांच्या १३० डावांमध्ये २४४४ धावा फटकावल्या आहेत. त्याच वेळी, दासकडे आता १११ सामन्यांच्या १०९ डावांत २४९६ धावा जमा आहेत. आता बांगलादेशसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो आता फक्त शाकिब अल हसन (२५५१) च्या मागे आहे.
हेही वाचा : Duleep Trophy Final सामन्यात मध्य झोनच्या रजत पाटीदारचा शतकी तडाखा! भारतीय संघात परतण्याची आशा बळावली
आशिया कपमधील तिसऱ्या सामन्याच्या निकालाबद्दल सांगायचे झाले तर, अबू धाबीमध्ये नाणेफेक जिंकून बांगलादेशने गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर हाँगकाँग प्रथम फलंदाजीसाठी मैदान्त उतरला. हाँगकाँग संघ २० षटकांत सात गडी गमावून १४३ धावाच करू शकला. हाँगकाँगकडून निजाकत खानने ४० चेंडूत ४२ धावांची सर्वाधिक धावा केल्या. तर बांगलादेशकडून तन्झिम हसन साकिबने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात कर्णधार लिटन दासच्या ३९ चेंडूत ५९ धावांच्या जोरावर बांगलादेशने हाँगकाँगचा ७ विकेट्सने विजय मिळवला.