Asia Cup 2025: The winning team in the Asia Cup will get a big prize; The best player in the tournament will also get a lot of money.
Asia cup 2025 : ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ च्या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. यावेळी आशिया कप हा स्वरूपात खेळवला जानर आहे. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, युएई, ओमान आणि हाँगकाँग या संघाचा समावेश आहे. आशिया कपचे यूएईमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ आधीच जाहीर करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघ निवडण्यात आला आहे. या स्पर्धसतही भारतीय संघ प्रमुख दावेदार मानला जात आहे. या स्पर्धेतील विजेता ठरणाऱ्या संघाला मोठी बक्षीस रक्कम देण्यात येणार असून त्यासोबतच स्पर्धेत सर्वोत्तम ठरणाऱ्या खेळाडूला देखील मालमाल होण्याची संधी असणार आहे.
हेही वाचा : IND Vs END : ‘मी तर आधीच ठरवले होते…’, इंग्लंड दौऱ्याबाबत भारताच्या स्टार गोलंदाजाचा मोठा खुलासा..
आशिया कप २०२२ मध्ये, श्रीलंका विजेता संघ ठरला होता. त्यावेळी विजेत्या संघाला सुमारे २००,००० अमेरिकन डॉलर्स (भारतीय रुपये- सुमारे १.६ कोटी रुपये) मिळाले होते, तर उपविजेत्या पाकिस्तानला १००,००० डॉलर्स (भारतीय रुपये- ८० लाख रुपये) देण्यात आले होते.
एका वृत्तानुसार, २०२५ मध्ये विजेता आणि उपविजेता दोघांनाही मागील स्पर्धेपेक्षा अधिक रक्कम देण्यात येण्याची शक्यता आहे. यावेळी विजेत्या संघाला ३००,००० अमेरिकन डॉलर्स (सुमारे २.६ कोटी रुपये) तर उपविजेत्या संघाला १,५०,००० अमेरिकन डॉलर्स (सुमारे १.३ कोटी रुपये) देण्यात येण्याची शक्यता आहे. या बक्षीस किमतीबाबत अद्याप अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही.
आशिया कप २०२२ मध्ये, श्रीलंकेच्या भानुका राजपक्षेने अंतिम सामन्यात ४५ चेंडूत नाबाद ७१ धावांची खेळी करून सामना जिकून दिल होता. तेव्हा त्याला त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याच वेळी, ६ सामन्यांमध्ये ९ विकेट्स आणि ६६ धावा करणाऱ्या वानिंदू हसरंगा यांना स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूम्हणून निवडण्यात आले होते. यासाठी त्याला १५,००० अमेरिकन डॉलर्स (सुमारे १३ लाख रुपये) मिळाले होते. यावेळी सामनावीर खेळाडूला सुमारे $5,000 (सुमारे 4.3 लाख रुपये) आणि तर मालिकाविराला यापेक्षा मोठी रक्कम देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : महिला विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ घोषित! संधी मिळालेल्या ‘या’ १७ वर्षीय विकेटकीपरची होतेय चर्चा..