दक्षिण आफ्रिका महिला संघ(फोटो-सोशल मीडिया)
South Africa announces women’s squad for Women’s World Cup : महिला विश्वचषक २०२५ साठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात १७ वर्षीय तरुण यष्टीरक्षक-फलंदाज कराबो मेसोचा देखील समावेश करण्यात अल आहे. ३० सप्टेंबरपासून महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी आफ्रिकन महिला संघ जाहीर करण्यात आला आहे.
संघात संधि देण्यात आलेल्या १७ वर्षीय मेसोने या वर्षी मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात वरिष्ठ संघात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी दोन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळलेले आहेत. २०२३ आणि २०२५ मध्ये दोन अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर मेसो तिच्या पहिल्या वरिष्ठ विश्वचषकात खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेटकडून महिला विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेची माजी कर्णधार डेन व्हॅन निकर्कचा या संघात स्थान देण्यात आले नाही. ती नुकतीच निवृत्तीनंतर सक्रिय झाली होती. तिला संघात स्थान देण्यात येणार नाहीत, याबाबत आधीच अंदाज लावण्यात आला होता.
नीकर्कने निवृत्तीनंतर विश्वचषक खेळण्यासाठी परतण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या निवडकर्त्यांनी माजी कर्णधाराकडे दुर्लक्ष केले होते आणि तरुण खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. दक्षिण आफ्रिकेने लॉरा वोल्वार्डच्या नेतृत्वाखाली संघ जाहीर केला आहे. याशिवाय संघात माजी कर्णधार सून लुस, मारिज्ने कॅप, क्लो ट्रायॉन आणि अयाबोंगा खाका यासारखे अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे.
विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानसोबत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १६ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार असून दुसरा सामना १९ सप्टेंबर रोजी आणि तिसरा आणि शेवटचा सामना २२ सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या एकदिवसीय मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका विश्वचषक खेळण्यासाठी भारताचा दौरा करणार आहेत.
हेही वाचा : IND Vs END : ‘मी तर आधीच ठरवले होते…’, इंग्लंड दौऱ्याबाबत भारताच्या स्टार गोलंदाजाचा मोठा खुलासा..
तसेच महिला विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिके आपला पहिला सामना इंग्लंडविरुद्ध गुवाहाटी येथे ३ ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा दूसरा सामना यजमान भारताविरुद्ध ९ ऑक्टोबरला विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे.
लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), अयाबोंगा खाका, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, मारिजने कॅप, ताजमिन ब्रिट्स, सिनालो जाफ्ता, नॉनकुलुलेको म्लाबा, अनेरी डर्कसेन, अनेके बॉश, मसाबता क्लास, सुने लुस, काराबो मेसो, तुमी शांखोम, नॉन्कुलुलेको म्लाबा.
प्रवास राखीव: मियाने स्मित.