भारतीय संघ(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs END : एक महिन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशी परतला आहे. इंग्लंड दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची अँडरसन-तेंडुलकर मालिका खेळवण्यात आली होती. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली होती. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार कामगिरी करत आपली छाप पाडली होती. यामध्ये यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. या मालिकेबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, या मालिकेत भारताच्या रोमांचक २-२ अशा बरोबरीचा क्षण कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय अनुभवांपैकी एक म्हणून त्याच्या आठवणींमध्ये कायमचा कोरला गेला आहे.
२९ वर्षीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने ‘द ओव्हल’ येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि निर्णायक कसोटीमध्ये चमकदार कामगिरी केली आणि एकूण ८ विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. एका मुलाखतीत बोलताना कृष्णा म्हणाला की, शारीरिकदृष्ट्या या दौऱ्यामुळे मी थकलो होतो. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर मी दहा दिवसांचा ब्रेक घेतला होता. ब्रेक दरम्यान देखील मला शरीरात वेदना जाणवत राहिल्या होत्या.
हेही वाचा : BCCI कडून Virat Kohli ला झुकते माप? लंडनमध्ये पास केली फिटनेस टेस्ट; भारतीय क्रिकेट जगतात गोंधळ
ओव्हल मैदानावर खेळवण्यात आलेल्या कसोटीच्या पाचव्या दिवसाची आठवण सांगताना कृष्णा म्हणाला की, “पहिला चेंडू, मी आधीच ठरवले होते की तो बाउन्सर टाकणार होतो. त्या चेंडूने चौकार मारला, पण त्यामुळे मला खेळपट्टीवर नेमके काय चालले आहे हे समजण्यास चांगली मदत झाली. दुसरा चेंडू आतल्या काठावर लागला. पहिल्या दोन चेंडूवर आठ धावा आल्या तरी, मी बराच संयमी राहिलो. मला माहित होते की मला एका विशिष्ट क्षेत्रात, एका विशिष्ट लांबीवर गोलंदाजी कर्वी लागणार आणि चेंडूला त्याचे काम करू द्यावे लागेल.” तसेच दुसऱ्या टोकाकडून दबाव निर्माण करण्याचे सारे श्रेय कृष्णाने मोहम्मद सिराजला दिले.
कृष्णा म्हणाला की, “पहिल्या काही षटकांमध्ये सिराजचा चेंडू माझ्यापेक्षा जास्त स्विंग होत अस्लयचे दिसत होते. जेमी स्मिथचे बाद होणे निर्णायक ठरले होते. त्या विकेटने सर्व काही बदलून टाकले. मग विकेट पडणे ही काळाची बाब होती. जेव्हा शेवटची विकेट पडली तेव्हा भारताने आनंद साजरा केला.”
त्या क्षणाची आठवण करून देत प्रसिद्ध कृष्णाने सांगितले की, “शेवटची विकेट पडल्यानंतर मला जो आनंद झाला तो शब्दात सांगणे कठीण आहे. टी विकेट आम्ही खूप उत्साहाने साजरी केली. भावना खूप जास्त होत्या. आता जेव्हा मी बसून खेळ पाहतो तेव्हा पूर्वीसारखा वाटत नाही. मैदानावर असल्याने वातावरण खूप चांगले, खूप उत्साही आणि खूप आनंद देणारे होते. हे असे काहीतरी आहे जे माझ्यासोबत नेहमीच राहणार. मला वाटत नाही की मी कधीही असा क्षण पुन्हा अनुभवू शकेल. फक्त बाहेरून बसून पाहत राहीन.” प्रसिद्ध कृष्णाने ५ सामन्यांच्या मालिकेत ३ सामने खेळले होते. यांमदये त्याने १४ बळी टिपले आहेत.