Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : ‘याआधी टी-२० मध्ये असे कधीच…’, भारताच्या ‘या’ सलामीवीराच्या वादळावर वसीम अक्रमची प्रतिक्रिया; पहा व्हिडीओ

आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने यूएई संघाला पराभूत करून विजयी सुरवात केली. या सामन्यात भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माची फलंदाजी बघून माजी पाकिस्तानी क्रिकेपटू वसिम अक्रम थक्कच झाला. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 11, 2025 | 03:51 PM
Asia Cup 2025: 'Never before in T20...', Wasim Akram's reaction to India's 'this' opener's storm; Watch video

Asia Cup 2025: 'Never before in T20...', Wasim Akram's reaction to India's 'this' opener's storm; Watch video

Follow Us
Close
Follow Us:

IND vs UAE : आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात सलामीचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकाँगचा ९४ धावांनी पराभव केला. तर आशिया कपमधील दूसरा सामना भारत आणि यूएई या दोन संघात खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने यूएईवर एकतर्फी विजय मिळवला. भारताने नानेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तर यूएई संघाने प्रथम फलंदाजी करत फक्त सर्व बाद ५७ धावाच केल्या. कुलदीप यादव(४)आणि अष्टपैलू शिवम दूबे(३) या जोडीने यूएई संघाला खिंडार पाडले. तर धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी केवळ २७ चेंडूत विजय संपादन केला. भारताकडून सलामीवीर अभिषेक शर्माने जोरदार फटकेबाजी केली. त्याने १६ चेंडूत ३० धावा काढल्या आणि तो बाद झाला. त्याच्या या वादळी खेळीने पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रम थक्कच  झाला आणि म्हणाला की मी असे याआधी कधी बघितले नाही.

हेही वाचा : IND vs UAE : कुलदीप यादवने घेतली UAE ची फिरकी; दिग्गज आर अश्विनला टाकले ‘या’ विक्रमात मागे..

यूएई संघाला भारतीय गोलंदाजांनी ५७ धावांवर गुंडाळल्यावर धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या भारतीय सलामीवीरांनी यूएईवर चांगलेच आक्रमण केले. या दरम्यान डावाची सुरुवात करताना अभिषेक शर्माने फक्त १६ चेंडूंचा सामना करत  १८७.५० च्या स्ट्राईक रेटने ३० धावा फटकावल्या. या खेळीत त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. या सामन्यादरम्यान कॉमेंट्री बॉक्समध्ये हजर असणारा माजी पाकिस्तानी कर्णधार वसीम अक्रम देखील अभिषेक शर्माची फलंदाजी पाहून आश्चर्यचकित झालेचे दिसून आले. विशेष म्हणजे शर्माने डावाच्या सुरवातीला पहिल्या दोन चेंडूंवर दोन मोठे फटके मारले. अभिषेकने यूएईचा गोलंदाज हैदर अलीच्या गोलंदाजीवर डावाच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लाँग ऑफवर वाइड षटकार ठोकला. यानंतर, त्याने दुसऱ्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार मारला.

Wasim Akram said (after seeing Abhishek sharma’s first ball six followed by 4” : ” I HAVE NEVER SEEN SOMETHING LIKE THIS IN T20” (Sony Sports)pic.twitter.com/mHSbBZlwJu — NKRian (VK) OG🔫 SSMB 29 ⚡ (@AnandSRH) September 10, 2025

काय म्हणाला अक्रम?

भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माची ही फटकेबाजी पाहून वसीम अक्रम त्याचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकला नाही. तो म्हणाला की “मी यापूर्वी टी-२० मध्ये असे याआधी कधीही पाहिले नव्हते.”

भारताकडून या सामन्यात चांगली गोलदाजी बघायला मिळाली. भारतीय गोलंदाजीसमोर यूएई संघाने गुढघे टकेले आणि संघ ५७ धावांवर सर्वबाद झाला आहे.  कुलदीप यादवने ७ धावा देत ४ विकेट घेतल्या तर शिवम दुबेने ४ धावा देत ३ विकेट घेतल्या. प्रतिउत्तरात भारताने २७ चेंडूतच हा सामना जिंकला आणि आपल्या मोहिमेची विजयी सुरवात केली.

हेही वाचा : Asia cup 2025 : शुभमन गिलचा षटकार पाहताच वसीम अक्रम चक्रावला! रिएक्शन झाली व्हायरल; पहा व्हिडिओ

Web Title: Asia cup 2025 watch wasim akrams reaction to abhishek sharmas innings in the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND vs UAE

संबंधित बातम्या

IND vs PAK : भारत-पाक अंतिम फेरीत पुन्हा आमनेसामने! ‘या’ दिवशी रंगणार Asia cup विजेतेपदाचा महामुकाबला
1

IND vs PAK : भारत-पाक अंतिम फेरीत पुन्हा आमनेसामने! ‘या’ दिवशी रंगणार Asia cup विजेतेपदाचा महामुकाबला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.