
Under 19 asia cup 2026
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत आक्रमक खेळ केला. भारतीय युवा संघाचे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येत आहे. आधीच्या संन्यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात अर्जुन राजपूतने शानदार शतकी खेळी केली होती. त्यानंतर आजच्या सामन्यात आर्यावीर सेहवागने शतक ठोकून भारताच्या फलंदाजीची ताकद दाखवून दिली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागने अंडर -19 एशिया कपमध्ये आक्रमक खेळीची चुणूक दाखवली आहे. यूएईविरुद्ध त्याने शानदार फलंदाजी करत आपल्या करकीर्दीचे पहिले शतक पूर्ण केले आहे. या तडाखेबंद खेळीमुळे भारतीय युवा संघाने सामन्यात आपले वर्चस्व अधिक मजबूत केले आहे.
युएईविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात आर्यवीरने सुरुवातीपासूनच शानदार आणि संयमी खेळी करण्यास सुरुवात केली. त्याने 168 बॉलमध्ये तब्बल 160 रन्सची आक्रमक खेळी केली आहे. त्याने आपल्या खेळीत 17 फोर आणि 7 सिक्स मारले आहेत. तसेच त्याने 131 बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले आहे. या स्पर्धेत यापूर्वी नेपाळविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने नाबाद ७० रन्सची खेळी केली आहे.
पहिली विकेट गेल्यावर आर्यवीर सेहवागने वीके विनीत याच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी शतकीय पार्टनरशिप रचली. या खेळीत त्याने अत्यंत वेगाने रन्स करण्यास सुरुवात केली आणि मोठी वैयक्तिक धावसंख्या उभी केली. ग्रुप ‘ए’ मधील समीकरण पाहता, भारतासाठी युएईविरुद्धचा हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आणि करो या मरो सारखा असणार आहे . या स्पर्धेच्या सुरुवातीला भारतीय संघाने नेपाळचा पराभव केला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
Ans: अंडर -19 मध्ये आज भारत आणि यूएईमध्ये सामना सुरू आहे.
Ans: यूएईविरुद्ध आर्यवीर सेहवागने 160 रन्सची आक्रमक खेळी केली.