Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK: पाकिस्तानकडून पराभव, तरीही टीम इंडिया सेमीफायनलच्या शर्यतीत; एका विजयाने बदलणार संपूर्ण समीकरण

India U19 Asia cup qualification Equation After Ind vs Pak: अंडर-१९ आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताचा पराभव झाला. परंतु पराभव होऊनही, भारत उपांत्य फेरी गाठू शकतो.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 09, 2026 | 04:45 PM
India U19 Asia cup qualification Equation

India U19 Asia cup qualification Equation

Follow Us
Follow Us:
  • आशिया कपमध्ये भारताचं आव्हान कायम
  • पाकिस्तानकडून पराभवानंतरही सेमीफायनलचा मार्ग खुला
  • UAE विरुद्ध विजयाचं समीकरण
IND vs PAK: अंडर -१९ आशिया कप स्पर्धेत, रविवार ८ नोव्हेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात भारताला पराभव पराभव पत्करावा लागला.पाकिस्तानने आपले दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीसाठी आधीच पात्रता मिळवली आहे, तर भारताचे प्रत्येकी २ सामन्यांनंतर २ गुण आहेत. हा सामना गमावूनही, भारतीय संघ एसीसी पुरुष अंडर -१९ आशिया कपच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. मात्र,यासाठी भारतीय संघाला एक शानदार पुनरागमन करावे लागेल. भारत उपांत्य फेरीत आपले स्थान कसे निश्चित करु शकतो, यासाठी कसे असेल समीकरण, जाणून घेऊयात. (U19 Asia Cup)

IND vs NZ: भारत-न्यूझीलंडच्या निर्णायक लढतीवर संकटाचे ढग; हॅमिल्टनमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, सामना रद्द होणार?

भारत आशिया कपच्या सेमिफायनलमध्ये पोहोचणार?

उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला युएईविरुद्धचा आपला पुढील सामना जिंकणे आवश्यक आहे. या सामन्यातील विजयामुळे भारताची थेट उपांत्य फेरीसाठी पात्रता निश्चित होईल. याउलट, युएईविरुद्ध पराभव झाल्यास स्पर्धेतील त्यांचा प्रवास संपुष्टात येईल. हा सामना भारतीय संघासाठी एक प्रकारे बाद फेरीचा आणि ‘करा किंवा मरा’ असा सामना ठरेल.

पाकिस्तान संघाकडून पराभूत होऊनही, भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. दोन सामन्यांनंतर भारत आणि युएई संघाकडे प्रत्येकी दोन गुण आहेत. पाकिस्तानने उपांत्य फेरीसाठी आधीच पात्रता मिळवली आहे. भारत आपला पुढील सामना युएई संघाविरुद्ध खेळेल.

 फलंदाजांकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. पण आता या स्टार फलंदाजांना युएईविरुद्ध दमदार कमबॅर करावे लागेल. संघाला सलामीवीर आर्यवीर सेहवागकडून आक्रमक सुरुवातीची अपेक्षा असेल. कर्णधार लक्ष्य रायचंदानीला आघाडीवरून नेतृत्व करून मोठी धावसंख्या उभारावी लागेल. विकेटकीपर अन्वय द्रविडची मधल्या फळीतील आणि शेवटच्या षटकांमधील स्फोटक फलंदाजी संघासाठी निर्णायक ठरेल. याशिवाय, पाकिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावणाऱ्या अर्जुन राजपूतवरही चाहते आणि संघ व्यवस्थापनाचे लक्ष असेल.

दोन्ही संघ

संयुक्त अरब अमिराती अंडर-१९ क्रिकेट संघ: अयान मिसबाह (कर्णधार), मोहम्मद नफीस (यष्टीरक्षक), यायिन राय, उदीश सुरी, नूरउल्ला अयुबी, झैनुल्लाह रहमानी, अहमद खुदादाद, नसीम खान, रैजल नादिर, उमर तौकीर, मुहम्मद उमर फैसल खान, हदायतुल्लाह खान

भारताचा अंडर – १९ क्रिकेट संघ: लक्ष्य राजेश रायचंदानी (कर्णधार), अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), रजत बघेल (यष्टीरक्षक), आर्यवीर सेहवाग, व्हीके विनीत, यशवीर गौड, अर्जुन राजपूत, इशान सूद, यशवर्धन चौहान, कुशाग्र ओझा, शविन विनोद, काव्या पटेल, मोहित उल्वा, मनाल चौहान, आर्यन

IPL 2027 लिलावाआधी ट्विस्ट! Mumbai – Punjab मध्ये पडद्यामागे सर्वात मोठी डील; हार्दिक-अर्शदीपच्या ट्रेडवर शिक्कामोर्तब होणार?

Web Title: India u19 asia cup semi final qualification equation after ind vs pak pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Aaryavir Sehwag
  • Asia Cup
  • IND VS PAK
  • IND vs UAE
  • U19 Asia Cup

संबंधित बातम्या

IND Vs PAK : पोरांनी अखेरपर्यंत झुंज दिली, पण सामना हातचा गेला! पॉईंट टेबलमध्येही भारताची पिछेहाट
1

IND Vs PAK : पोरांनी अखेरपर्यंत झुंज दिली, पण सामना हातचा गेला! पॉईंट टेबलमध्येही भारताची पिछेहाट

Ind vs Pak : फक्त अर्जुनलाच ‘रण’नीती कळली; बाकीचे ढेपाळले, भारताचे पाकिस्तानसमोर 209 धावांचे आव्हान
2

Ind vs Pak : फक्त अर्जुनलाच ‘रण’नीती कळली; बाकीचे ढेपाळले, भारताचे पाकिस्तानसमोर 209 धावांचे आव्हान

IND vs PAK: दिवाळीच्या दिवशी पाकिस्तानची धुलाई करण्यासाठी टीम इंडिया सज्ज! कधी अन् केव्हा रंगणार महामुकाबला?
3

IND vs PAK: दिवाळीच्या दिवशी पाकिस्तानची धुलाई करण्यासाठी टीम इंडिया सज्ज! कधी अन् केव्हा रंगणार महामुकाबला?

IND vs NEP: आधी गोलंदाजांनी नेपाळला गुंडाळलं, मग आर्यवीर-लक्ष्यने मैदान गाजवलं; Team India चा एकतर्फी विजय
4

IND vs NEP: आधी गोलंदाजांनी नेपाळला गुंडाळलं, मग आर्यवीर-लक्ष्यने मैदान गाजवलं; Team India चा एकतर्फी विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.