Asia Cup 2025: Who will win the Asia Cup? Who has the highest strike rate in the Indian team? Find out
अभिषेक शर्मा : भारतीय संघाकडून टी 20 मध्ये सर्वोच्च स्ट्राईक रेटचा विक्रम हा सलामीवीर अभिषेक शर्मा याच्या नावावर जमा आहे. अभिषेकने 17 टी 20 सामने खेळले आहेत. आया सामन्यांमध्ये त्याने 535 धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट 193.85 आहे.
सूर्यकुमार यादव : भारतीय संघाकडून टी 20 मध्ये स्ट्राईक रेटच्याबाबत दुसऱ्या स्थानी सूर्यकुमार यादवचे नाव येते. सूर्यकुमार यादव टी 20 कारकीर्दीत 167.08 च्या स्ट्राईक रेटने या धावा फटकावल्या आहेत.
रिंकु सिंह : टी 20 मध्ये स्ट्राईक रेटच्याबाबत स्टार फिनिशीर रिंकु सिंह याचा तिसरा क्रमांक येतो. १५ आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहेत. या १५ सामन्यांमध्ये त्याने ३५६ धावा फटकवल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 161.07 इतका आहे.
तिलक वर्मा : भारतीय संघाकडून टी 20 मध्ये स्ट्राईक रेटच्या यादीमध्ये तिलक वर्माचा चौथा नबर लागतो. त्याचा 25 टी 20 सामन्यांनंतर 155.08 असा स्ट्राईक रेट आहे. तिलकने टी 20 कारकीर्दीमध्ये 749 धावा केल्या आहेत.
संजू सॅमसन : टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ३१ सामन्यांमध्ये ३३.६२ च्या सरासरीने आणि १५७.०९ च्या स्ट्राईक रेटने ९०८ धावा केल्या आहेत, ज्यात ३ शतके आणि ३ अर्धशतकं झळकावली आहेत.
शुभमन गिल : शुबमन गिलने 21 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 139.28 च्या स्ट्राईक रेटने 579 धावा केल्या आहेत. गिलने टी 20 क्रिकेटमध्ये 3 अर्धशतकं आणि 1 शतक झळकावलं आहे.