Asia Cup 2025: Will star Shreyas Iyer return to the team for the Asia Cup? He will play the field after 20 months..
Asia Cup 2025 : आशिया कपचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होऊ होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामने खेळत आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ओव्हल येथे खेळवला जात आहे. या मालिकेनंतर काही दिवसांनी आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, श्रेयस अय्यर या संघात पुनरागमन करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
श्रेयस अय्यर भारतासाठी शेवटचा टी-२० सामना ३ डिसेंबर २०२३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगळुरूमध्ये खेळला होता. आता तब्बल २० महिन्यांनंतर, अय्यर भारतीय टी-२० संघात परतण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धेत दुलीप ट्रॉफीसाठी पश्चिम विभागीय संघ जाहीर झाला आहे. या संघात अय्यरचा समावेश करण्यात आला आहे. परंतु त्याची संघाच्या कर्णधारपदी वर्णी लागली नाही.
हेही वाचा : IND vs ENG 5th Test : इंग्लिश क्रिकेटपटू ‘पांढरे हेडबँड’ घालून उतरले मैदानात; कारण आलं समोर, वाचा सविस्तर
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरला आशिया कपसाठी भारतीय टी-२० संघात संधी मिळू शकते. म्हणूनच अय्यरची पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली नाही. अहवालात असे देखील लिहिले आहे की, अय्यरला कर्णधार न करण्यामागे कारण म्हणजे निवड समितीला वाटले की त्याची ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप संघात निवड होण्याची शक्यता आहे.
श्रेयस अय्यरने ५१ टी-२० सामने खेळला आहेत. यामध्ये त्याने ११०४ धावा केल्या आहेत. अय्यरने अलिकडच्या काळात आपला उत्तम फॉर्म दाखवून दिला आहे. अय्यरने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना १७ सामन्यांमध्ये ६०४ धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने संघाचे नेतृत्व करत संघाला अंतिम फेरीतही पोहोचवले होते. त्याच्या कामगिरीनंतर, अय्यरची भारतीय कसोटी संघात देखील निवडी होण्याची शक्यता बळावली होती, परंतु निवडकर्त्यांनी त्याकडे काना डोळा केला आहे. परंतु आता या स्टार खेळाडूचे टी-२० मध्ये पुनरागमन जवळजवळ निश्चित असल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा : Duleep Trophy 2025 : पश्चिम विभाग संघाची घोषण; ना अय्यर, ना ऋतुराज, ‘या’ स्टार खेळाडूकडे सोपवली संघाची धुरा
आशिया कप २०२५ चा हंगाम ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. हा हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. हा हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. या वर्षीचा सामना टी-२० आंतरराष्ट्रीय स्वरूपात होणार आहे. गतविजेता भारत १० सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध आपला मोहीम सुरू करणार आहे. तसेच भारत १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध एक हाय-होल्टेज सामना खेळणार आहे. भारताचा शेवटचा गट फेरीतील सामना १९ सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध होईल.