इंग्लंड खेळाडू(फोटो-सोशल मीडिया)
England Players Wearing White Headbands: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामान्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. हा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. हा सामना 31 जुलेपासून सुरु झाला आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाअखेर भारताने पहिल्या दिवसाखेर ६ गडी गमावून २०४ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी इंग्लंडने भारताचा डाव २२४ धावांवर गुंडाळला आहे. दरम्यान या सामन्यातील दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघातील खेळाडू पांढरे हेडबँड घालून मैदानात दिसून आले. इंग्लिश खेळाडूंनी पांढरे हेडबँड का घातले असावे असा प्रश्न चाहत्यां पडला आहे. परंतु, यायचे करणं आता समोर आले आहे. याबाबत आपण माहिती घेऊया.
हेही वाचा : Duleep Trophy 2025 : पश्चिम विभाग संघाची घोषण; ना अय्यर, ना ऋतुराज, ‘या’ स्टार खेळाडूकडे सोपवली संघाची धुरा
इंग्लंडच्या खेळाडूंनी पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दिवंगत क्रिकेटपटू ग्राहम थॉर्प यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पांढरे हेडबँड घातले आहे. यासोबत त्यांनी 100 कसोटी सामने खेळणाऱ्या ग्राहम थॉर्प या अनुभवी खेळाडूचा सन्मान करण्यासाठी चाहत्यांमध्ये सामील झाले आहेत. 2021 मध्ये इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक राहिलेले थॉर्प यांनी नैराश्याशी दीर्घ झुंज देऊन अखेर मागील वर्षी ऑगस्टमध्ये आत्महत्या करून आयुष्यचा शेवट केला होता.
भारताविरुद्ध खेळण्यात येत असलेल्या पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी थॉर्पचा 56 वा वाढदिवस आहे. तसेच त्यांच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळवला जात आहे. सरेकडून शुक्रवारी ‘थॉर्पसाठी एक दिवस’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थॉर्प त्याच्या खेळण्याच्या कारकिर्दीत घालत असलेल्या थॉर्पच्या आद्याक्षरांसह आणि प्रतिमेसह असलेले हेडबँड, माइंड मेंटल हेल्थ चॅरिटीसाठी निधी उभारण्यासाठी 5 पौंड रुपयांना विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. दरम्यान इंग्लंड संघाकडून त्यांचा सराव पूर्ण करताना ते हेडबँड घातलेले होते.
For Thorpey ❤️ pic.twitter.com/j5D2OPcy4P — England Cricket (@englandcricket) August 1, 2025
हेही वाचा : IND vs ENG : भारताचा पहिला डाव २२४ धावांवर गडगडला; गस अॅटकिन्सनचा विकेट्सचा पंजा
सामन्यापूर्वी स्टोक्सने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “इंग्लिश क्रिकेटमध्ये थॉर्प हा खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून खूप प्रभावशाली व्यक्तिरेखा असणारा आहे. त्या ड्रेसिंग रुममध्ये आमच्यापैकी काहींनी त्याच्यासोबत बराच वेळ घालवला आहे. इंग्लिश क्रिकेटसाठी तो किती महत्त्वाचा होता, तसेच तो सध्याच्या इंग्लंड ड्रेसिंग रुमसाठी किती महत्त्वाचा आहे हे पाहण्यासाठी हा सर्व इंग्लिश चाहत्यांसाठी आणि कुटुंबासाठी एक खास दिवस असणार आहे. अर्थातच, हा अनेक लोकांसाठी भावनिक दिवस असेल परंतु, असा दिवसही असेल जेव्हा खेळातील एका महान खेळाडूचं कौतुक केलं जात असेल.”