Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: फायनलमध्ये पराभव, पण इतिहासाच्या पानावर नाव! Anahat Singh ने स्क्वॉशमध्ये जिंकलं ऐतिहासिक सिल्व्हर

Anahat Singh Won Silver in Squash Asian Games 2026: १८ वर्षीय भारतीय महिला स्क्वॅशपटू अनाहत सिंगने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 27, 2026 | 04:45 PM
Anahat Singh Won Silver in Squash

Anahat Singh Won Silver in Squash

Follow Us
Follow Us:
  • गोल्ड हुकलं, पण इतिहास घडला
  • अनाहत सिंगने जिंकलं ऐतिहासिक रौप्य
  • महिला एकेरी स्क्वॉशमध्ये भारताला सिल्व्हर
जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा २०२६ मध्ये स्क्वॉश महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची स्टार खेळाडू अनाहत सिंगचा सामना मलेशियाच्या शिवसंगारी सुब्रमण्यमशी झाला. सुवर्णपदकाच्या सामन्यात अनाहत सिंगला मलेशियाची खेळाडू शिवसंगारी सुब्रमण्यम हिच्याकडून ४-११, ४-११, ७-११ ने पराभव पत्कारावा लागला. या पराभवामुळे १८ वर्षीय अनाहतचे सुवर्णपदक हुकले. परंतु, अनाहत (Anahat Singh) आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात स्क्वॉशच्या एकेरी प्रकारात रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे.

Asian Games 2026: गोल्डसाठी अखेरपर्यंत झुंज, पण स्वप्न भंगलं! Abhay Singh ने रचला इतिहास; स्क्वॉशमध्ये भारताला रौप्यपदक

अनाहतचे गोल्ड हुकलं पण सिल्हवर केला नावावर

अंतिम सामन्यात, मलेशियाच्या शिवसंगारीने पहिल्या सेटमध्ये ६-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर अनाहतवर दबाव आणला. शिवसंगारीने सुरुवातीपासूनच जोरदार आक्रमक खेळाने रॅलीवर नियंत्रण मिळवले आणि पहिला सेट ११-४ ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही अनाहत ६-२ ने मागे पडली. शिवसंगारीने पुन्हा शानदार कामगिरी करत दुसरा सेट ११-४ ने जिंकला. तिसऱ्या सेटमध्येही अनाहतला मोठी आघाडी घेता आली नाही. ती सुरुवातीलाच ४-० ने मागे पडली. या सामन्यात शिवसंगारीने एका चॅम्पियनप्रमाणे कामगिरी करत तिसरा सेट ११-७ ने जिंकून सुवर्णपदक पटकावले. तर अनाहतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अनाहत ही आशियाई क्रीडा (Asian Games 2026) स्पर्धेच्या महिला एकेरी स्क्वॅश अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली होती.

अनाहतने ऑलिम्पिकसाठीची थेट पात्रता गमावली

२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाच्या सामन्यात पराभूत झाल्यामुळे, अनाहत सिंगने २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक खेळांमध्ये थेट स्थान मिळवण्याची संधी गमावली आहे.

अभय सिंगचाही पराभव

स्क्वॉशमध्ये सुवर्णपदकासाठी आज दोन सामने खेळवे गेले. भारताने दोन्हीमध्ये रौप्यपदक जिंकले. दोन्ही खेळाडूंचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.अनाहत व्यतिरिक्त, पुरुष एकेरी स्क्वॅश स्पर्धेत, भारताच्या अभय सिंगला सुवर्णपदकाच्या सामन्यात मलेशियाच्या युन यू एनजीकडून ११-९, ११-५, ११-५ अशा तिन्ही सेटमध्ये एकतर्फी पराभव पत्करावा लागला. अभयला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले असले तरी, तो २०१४ आणि २०२३ मध्ये एकेरीत रौप्यपदक जिंकणाऱ्या सौरव घोषालनंतर या स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा दुसरा भारतीय पुरुष खेळाडू ठरला. परंतु, अंतिम सामन्यातील या पराभवामुळे तो लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरू शकला नाही.

Asian Games 2026: पंचवर पंच अन् प्रतिस्पर्धी चितपट! Ankush Panghal ची सेमीफायनलमध्ये धडक; बॉक्सिंगमध्ये भारताचं मेडल पक्कं

Web Title: Asian games 2026 anahat singh won silver medal squash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • asian games 2026
  • India vs Malaysia
  • Silver Medal
  • Squash

संबंधित बातम्या

Asian Games 2026: गोल्डसाठी अखेरपर्यंत झुंज, पण स्वप्न भंगलं! Abhay Singh ने रचला इतिहास; स्क्वॉशमध्ये भारताला रौप्यपदक
1

Asian Games 2026: गोल्डसाठी अखेरपर्यंत झुंज, पण स्वप्न भंगलं! Abhay Singh ने रचला इतिहास; स्क्वॉशमध्ये भारताला रौप्यपदक

Asian Games 2026: पंचवर पंच अन् प्रतिस्पर्धी चितपट! Ankush Panghal ची सेमीफायनलमध्ये धडक; बॉक्सिंगमध्ये भारताचं मेडल पक्कं
2

Asian Games 2026: पंचवर पंच अन् प्रतिस्पर्धी चितपट! Ankush Panghal ची सेमीफायनलमध्ये धडक; बॉक्सिंगमध्ये भारताचं मेडल पक्कं

लक्ष्य सेनची झुंज अपुरी! माजी वर्ल्ड चॅम्पियनकडून पराभव, Asian Games 2026 मधील आव्हान संपुष्टात
3

लक्ष्य सेनची झुंज अपुरी! माजी वर्ल्ड चॅम्पियनकडून पराभव, Asian Games 2026 मधील आव्हान संपुष्टात

Asian Games : स्क्वॉशमध्ये अभय सिंहची फायनलमध्ये धडक, पाकिस्तानी खेळाडूला घरचा रस्ता दाखवत केलं पदक निश्चित
4

Asian Games : स्क्वॉशमध्ये अभय सिंहची फायनलमध्ये धडक, पाकिस्तानी खेळाडूला घरचा रस्ता दाखवत केलं पदक निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.