Abhay singh won silver in squash
अभय सिंगने पहिल्या सेटमध्ये आपली ताकद दाखवली. त्याने एनजी ईन येओला चांगलाच घाम फोडला. परंतु, अभय पहिला सेट ११-९ ने हरला. दुसऱ्या सेटमध्ये मलेशियन खेळाडूने अभयवर दबाव आणला आणि सेट ११-५ ने सहज जिंकून २-० अशी आघाडी घेतली. तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये अभयने शानदार कमबॅक करत ४-२ अशी सुरुवातीची आघाडी घेतली. मात्र, एनजी ईन येओने लगेचच पुनरागमन करत ६-५ अशी आघाडी घेतली. अखेरीस मलेशियन खेळाडूने ११-५ ने तिसरा सेट जिंकून सुवर्णपदक पटकावले. विजयानंतर ईन येओ भावूक झाला होता, त्याच्या डोळ्यात अश्रू होते. या विजयामुळे तो आशियाई क्रीडा स्पर्धेत डबल गोल्ड मेडलिस्ट विजेता ठरला असून, त्याने २०२८ च्या ऑलिम्पिकसाठीही पात्रता मिळवली आहे.
Silver for Abhay 🥈 India’s Abhay Singh finishes his #AichiNagoya2026 campaign with a silver medal in squash men’s singles. 👏 pic.twitter.com/PfijjpXDMM — Olympic Khel ™ (@OlympicKhel) September 27, 2026
अंतिम सामन्यात अभय सिंगला सुवर्णपदक मिळाले नसले तरी, संपूर्ण स्पर्धेतील त्याची कामगिरी प्रेरणादायी होती. उपांत्य फेरीत अभय सिंगने उत्कृष्ट खेळ केला. त्याने पाकिस्तानच्या मुहम्मद इरफानला सरळ सेटमध्ये ३-० ने पराभूत केले. अभयने आक्रमक सुरुवात करत पहिला गेम ११-३ ने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये इरफानने जोरदार झुंज दिली, पण त्याला यश मिळाले नाही. अभयने शानदार खेळ दाखवत दुसरा सेट १२-१० ने जिंकला. त्याने तिसरा गेमही ११-६ ने जिंकून एक मोठा विजय मिळवला. संपूर्ण सामन्यादरम्यान अभयने इरफानवर वर्चस्व गाजवले.
अभय सिंग हा भारताच्या स्टार स्क्वॅश खेळाडूंपैकी एक असून, त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करून राष्ट्रीय संघात आपले स्थान पक्के केले आहे. त्याने पीएसए टूरवर अनेक विजेतेपदे पटकावली आहेत. याशिवाय, त्याने आशियाई क्रीडा, आशियाई सांघिक चॅम्पियनशिप आणि जागतिक सांघिक चॅम्पियनशिप यांसारख्या अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.






