Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक

Asian Games 2026 : भारताची सेलर नेत्रा कुमाननने डिंगी स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. थायलंडची सोफिया माँटगोमरीने पाच प्वॉइंट्ससह सुवर्ण पदकाची कमाई केली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 02, 2026 | 03:20 PM
Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक

Follow Us
Follow Us:
  • नेत्रा ऑलिम्पिक गाठणारी पहिला महिला सेलर
  • यंदा क्वालिफिकेशनमध्ये दमदार कामगिरी
  • विष्णू सरवननच्या हाती निराशा
भारताची सेलर नेत्रा कुमानने एशियन गेम्स 2026 (Asian Games 2026) मध्ये महिलांच्या डिंगी स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. काइयोह यॉट हार्बरमध्ये दोन शर्यतीच्या फायनल मालिकेनंतर नेत्राने 14 प्वॉइंट्ससह स्पर्धा फिनिश केली. थायलंडची सोफिया माँटगोमरीने पाच प्वॉइंट्ससह गोल्ड, तर सिंगापुरच्या जानिया यंगने 13 प्वॉइंट्ससह सिल्वरला गवसणी घातली.

एशियन गेम्स 2026 मध्ये भारताचे सेलिंगमधील हे तिसरे पदक आहे. त्याआधी पुरुषांच्या स्किफमध्ये मनु फ्रान्सिस व प्रिंस कुरिसिंकल नोबलने सिल्वर व महिलांच्या स्किफमध्ये हर्षिता तोमर व शीतल वर्माने ब्रॉन्ज पदक जिंकले होते.

नेत्राची क्वालिफिकेशनमध्ये दमदार कामगिरी

नेत्राने आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या क्वालिफिकेशन सिरीजमध्ये सात रिकॅलकुलॅटेड प्वॉइंट्ससह फायनल गाठली होती. फायनल-1 मध्ये नेत्रा सहाव्या स्थानी राहिली, पण फायनल-2 जिंकत (एक प्वॉइंट जोडून) तिने दमदार पुनरागमन केले, ज्यामुळे ती एकूण प्वॉइंटच्या आधारे तिसऱ्या स्थानी राहिली.

नेत्रा 14 नेट प्वॉइंट्स (क्वालीफिकेशन सिरीज आणि फायनलचे 7-7 प्वॉइंट्स)सोबत हाँगकाँगच्या स्टेफनी नॉर्टनसोबत राहिली, पण संपूर्ण सिरीजमधील सर्वोत्तम हेड टू हेड रेकॉर्डला पाहता टाय ब्रेकमध्ये तिने कांस्य पदक पटकावले.

Asian Games 2026: कोरियाचा गड भेदला, ४८ वर्षांचा विक्रम मोडला! कुमकुम-अंकिता-कीर्तीचा सुवर्णवेध; रिकर्व्हमध्ये भारताला पहिले गोल्ड

ऑलिम्पिक गाठणारी पहिली महिला सेलर

नेत्रा 2021 मध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला सेलर बनत इतिहास रचला होता. त्यानंतर तिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठीही पात्रता गाठली होती. दुसरीकडे, शुक्रवारी विष्णू सरवनन, जो दोन वेळचा ऑलिम्पिकपटू आहे, तो पुरुषांच्या डिंगीमध्ये 21 प्वॉइंट्ससह चौथ्या स्थानी राहिला. कोरिया गणराज्यचा जी मिनने 9 प्वॉइंट्ससोबत सुवर्ण पदक जिंकले, तर मलेशियाच्या खैरुलनिजाम मोहम्मद अफेंडी 14 प्वॉइंट्ससोबत दुसऱ्या स्थानी राहिला. सरवनने हाँगझोऊ एशियन गेम्स 2023 मध्ये कांस्य जिंकले होते.

Asian Games 2026: फायनलचा काउंटडाऊन सुरू! गोल्ड मेडलसाठी IND vs PAK भिडणार; कधी अन् कुठे पाहाल Live ॲक्शन?

तसेच भारताचा कॅनो स्लॅलम मोहिम कोणत्याही पदकाशिवाय संपुष्टात आली. एकूण पाच भारतीयांनी पाच मेडर इवेंट्स म्हणजेच पुरुषांच्या कयाक एकेरी, पुरुषांच्या कयाक क्रॉस, महिलांच्या कॅनो एकेरी, महिलांची कयाक एकेरी आणि महिलांच्या कयाक क्रॉसमध्ये भाग घेतला होता.

भारतासाठी सर्वात चांगला निकाल पुरुषांच्या कयाक एकेरीत आला, जिथे प्रद्युम्न सिंह राठोड 10 फायनलिस्टमध्ये 125.21 च्या स्कोरसोबत सहाव्या स्थानी राहिला, ज्यात सहा सेकंदच्या टाइम पेनल्टीचा समावेश होता.

Web Title: Asian games 2026 sailor netra kumanan win bronze rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • asian games 2026
  • indian team
  • Paris Olympic 2024

संबंधित बातम्या

Asian Games 2026: फायनलचा काउंटडाऊन सुरू! गोल्ड मेडलसाठी IND vs PAK भिडणार; कधी अन् कुठे पाहाल Live ॲक्शन?
1

Asian Games 2026: फायनलचा काउंटडाऊन सुरू! गोल्ड मेडलसाठी IND vs PAK भिडणार; कधी अन् कुठे पाहाल Live ॲक्शन?

Asian Games 2026: कोरियाचा गड भेदला, ४८ वर्षांचा विक्रम मोडला! कुमकुम-अंकिता-कीर्तीचा सुवर्णवेध; रिकर्व्हमध्ये भारताला पहिले गोल्ड
2

Asian Games 2026: कोरियाचा गड भेदला, ४८ वर्षांचा विक्रम मोडला! कुमकुम-अंकिता-कीर्तीचा सुवर्णवेध; रिकर्व्हमध्ये भारताला पहिले गोल्ड

Asian Games 2026: सुवर्ण हुकले, इतिहास घडला! कुमकुम-धीरजची तिरंदाजीत कमाल; रिकर्व्हमध्ये भारताला पहिल्यांदाच रौप्य
3

Asian Games 2026: सुवर्ण हुकले, इतिहास घडला! कुमकुम-धीरजची तिरंदाजीत कमाल; रिकर्व्हमध्ये भारताला पहिल्यांदाच रौप्य

Asian Games 2026: लवलीना बोरगोहेनच्या वाढदिवसाचं गिफ्ट, मेरी कॉमच्या 12 वर्षाच्या रेकॉर्डशी बरोबरी; ऐतिहासिक सुवर्णपदक
4

Asian Games 2026: लवलीना बोरगोहेनच्या वाढदिवसाचं गिफ्ट, मेरी कॉमच्या 12 वर्षाच्या रेकॉर्डशी बरोबरी; ऐतिहासिक सुवर्णपदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.