भारताच्या मुलीची कमाल, मिळवले सुवर्णपदक; घडवला इतिहास (फोटो सौजन्य - X.com)
२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे भारताचे पाचवे सुवर्णपदक होते. तिच्या उल्लेखनीय कामगिरीने जपानमध्ये भारताला अभिमान मिळवून दिला. गोल्डन गर्ल नीरूचा जन्म २५ मे २००० रोजी झाला असून ती हरियाणातील जिंद येथील रहिवासी आहे. ती दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजमध्ये प्रशिक्षण घेते आहे आणि तिने कमालीची कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर
नीरूचे या कामगिरीसाठी सगळ्याच स्तरावर विशेष कौतुक होत आहे आणि याला कारणही तसंच आहे. अत्यंत खराब वातावरणातही तिने आपलं ध्येय आणि धैर्य सोडलं नाही. अंतिम सामन्यात नीरूने ६ सिरीजमध्ये एकूण २८ निशाणे तिने लावले आणि हे सुवर्णपदक आपल्या नावे केले. पावसाच्या व्यत्ययानंतरही तिने आपली एकाग्रता कायम ठेवली आणि ही कामगिरी करत सर्वांच्या तोंडी आपलं नाव येईल याची उत्तमरित्या दखल घेतली आहे.
नीरूला हे सुवर्णपदक अचानक मिळाले नसून गेले कित्येक वर्ष यासाठी ती चांगला खेळ करत आहे आणि अनेक वर्ष केलेल्या श्रमाचं तिला अखेर फळ मिळालं असल्याचं दिसून येत आहे. २०२५ मध्ये तिने आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.
यानंतर, २०२६ मध्ये, नीरूने इटलीतील लोनाटो येथे झालेल्या आयएसएसएफ शॉटगन विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. ISSF विश्वचषक स्पर्धेत वैयक्तिक ट्रॅप सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. नीरूने आशियाई क्रीडा स्पर्धेतही आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवला. पात्रता फेरीत, तिने ५० पैकी ४८ लक्ष्ये भेदली आणि संयुक्तपणे प्रथम स्थान पटकावले. यावरून अंतिम फेरीपूर्वीच तिच्या आत्मविश्वासाची आणि फॉर्मची झलक मिळाली.
Asian Games 2026 : भाला फेकीत भारताचा ‘डबल धमाका’, यशवीरला रौप्य, तर रोहितला कांस्य पदक
नीरूने यापूर्वीही आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक प्रकारात भारतासाठी पदक जिंकले होते. नीरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्या भारतीय संघाने महिलांच्या ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकले. त्यांनी एकत्रितपणे ३२८ गुण मिळवले आणि चीननंतर दुसरे स्थान पटकावले. २५ मे २००० रोजी जन्मलेली नीरू धांडा हरियाणातील जिंद येथील असून, ती दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजमध्ये प्रशिक्षण घेते. तिच्या क्रीडा कारकिर्दीत शासकीय पाठिंबा देखील महत्त्वपूर्ण ठरला आहे. त्यांना उपकरणे, दारुगोळा, निवास आणि भोजन, तसेच किरकोळ खर्चासाठी भत्ता मिळाला. त्यांना भारताच्या क्रीडा अभियान ‘टॉप्स’ (TOPS) अंतर्गत ₹100,000 आणि ‘एसीटीसी’ (ACTC) अंतर्गत ₹25.09 लाखांहून अधिक आर्थिक मदतही मिळाली.






