
Asian Games 2026 Women's Cricket
T20 क्रिकेटमध्ये Jos Buttler ची ‘दादागिरी’; असा विक्रम करणारा पहिलाच फलंदाज, पोलार्डला दिला ‘झटका’
पहिला उपांत्यपूर्व सामना बांग्लादेश आणि चीन यांच्यात खेळला गेला. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. आपल्या जास्त पॉईंट्समुळे बांग्लादेश उपांत्य फेरीत पोहोचला. दुसरा उपांत्य सामना थायलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने तीन विकेट्सने विजय नोंदवला. तिसरा सामना श्रीलंका आणि मलेशिया यांच्यात खेळला गेला आणि श्रीलंकेने ८६ धावांनी विजय मिळवला. चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने जपानला ८ विकेट्सने हरवले. जपानचा दारुण पराभव करून भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला.
पहिला उपांत्य सामना २० सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाईल. हा सामना सकाळी ५:३० वाजता सुरू होईल. श्रीलंका हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. दुसरा उपांत्य सामना २० सप्टेंबर रोजी भारत आणि बांग्लादेश यांच्यात खेळला जाईल. हा सामना सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. हे संघ नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्येही एकमेकांसमोर आले होते, जिथे भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेतही अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट खेळाडू आहेत. श्रीलंकेनेही या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
प्रथम फलंदाजी करताना जपानचा संघ ५७ धावांत सर्वबाद झाला. श्री चरणीने सर्वाधिक विकेट्स घेतले, तर शेफाली वर्माने दोन विकेट्स घेतले. भारताने अवघ्या पाच षटकांत दोन विकेट्स गमावून लक्ष्य पूर्ण केले. शेफालीने सर्वाधिक ४० धावा केल्या आणि तिला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. भारतीय संघाने दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम सामना जिंकून सुवर्णपदकावर भारताचे लक्ष असेल.