फोटो सौजन्य – X/BCCI
भारताच्या संघासाठी मोहम्मद सिराजने कमालीची कामगिरी केली त्याने या शेवटच्या सामन्यामध्येच नाही तर संपुर्ण मालिकेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतले आणि भारताच्या संघाला पाचव्या सामन्यात विजय मिळवुन देऊन मालिका ड्राॅ केली आहे. भारताच्या संघाने या मालिकेमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने मालिकेचे दोन सामने खेळले नाही आणि हेच दोन सामने भारताच्या संघाने जिंकले. एजबॅस्टन येथे झालेला भारताचा सामना हा सिराज आणि आकाशदीप यांनी कमालीची कामगिरी केली.
सिराजने या मालिकेमध्ये एकही सामना हुकवला नाही त्याने सातत्याने त्याचे प्रयत्न सुरु ठेवले. भारताच्या संघाने केलेल्या कामगिरीनंतर जगभरामध्ये मोहम्मद सिराज आणि भारतीय युवा खेळाडूंची कामगिरीची चर्चा केली जात आहे. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये पाकिस्तानचे दोन खेळाडू हे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या कामगिरीबद्दल चर्चा करताना भिडले आणि त्याच्यामध्ये मोठा वाद पाहायला मिळाला.
पाकिस्तानचे माजी खेळाडू असिम खान आणि तनवीर अहमद हे भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये झालेल्या मालिकेबद्दल चर्चा करताना तनवीर अहमद याने भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या कामगिरी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. चर्चा सुरु असताना तनवीर अहमद म्हणाला की, भारताचे गोलंदाज हे एकाच जागेवर चेंडू टाकत होते. यावर असिम खान म्हणाला की, तु तर मोहम्मद सिराजला गोलंदाज समजत नाही. यावर तनवीर अहमद म्हणतो की मला तो त्या लेवलचा गोलंदाज वाटत नाही.
यावर असिम खान म्हणतो की, तुमची लेवल काय आहे. पुढे ते म्हणतात की एक गोलंदाज आहे जो संघासाठी सातत्याने विकेट्स घेत आहे तरी तुम्ही त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. या वक्तव्यावरुन या दोघांमध्ये मोठा वाद होतो आणि हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यावर भारतीय चाहत्याच्या अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
एका युजर्सने लिहीले आहे की, ‘तन्वीर इंडिया का नाम एम व्ह्यूज लेना बँड करो’ तर दुसऱ्याने लिहीले आहे की, तुला अप्रूवल की गरज नाही सिराज भाई बोलण्यासाठी. तो सर्वोत्तम भारतीय गोलंदाजांपैकी एक आहे.