फोटो सौजन्य – X (Sony Sports Network)
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या पाचव्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी थ्रिलर्स सामना पाहायला मिळाला. चौथ्या दिनी पावसाच्या आगमनामुळे सामना थांबवण्यात आला होता. त्यानंतर चौथा दिनाच्या समाप्ती नंतर इंग्लंडच्या संघाला 35 धावांची गरज विजयासाठी हवी होती तर भारताच्या संघाला चार विकेटची गरज होती. प्रसिद्ध कृष्णा याच्या पहिल्या ओव्हर मध्ये जेमी ओवरटर्न याने दोन चौकार मारून पाचव्या दिनाची इंग्लंडसाठी दमदार सुरुवात केली होती. पुढच्यावरला मोहम्मद सिराजने बॉलिंग केली आणि जेमी ओवर्टनला बाहेरचा रस्ता दाखवला होता.
भारताच्या संघाने सामना जिंकल्यानंतर जगभरामधून क्रिकेट चाहत्याच्या त्याचबरोबर दिग्गज खेळाडूंच्या देखील प्रतिक्रिया सोशल मीडियावर आल्या आहेत. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा शेवट अतिशय रोमांचक पद्धतीने झाला. लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे टीम इंडियाने ६ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. ओव्हलवरील या ऐतिहासिक विजयानंतर चाहते, खेळाडू आणि दिग्गजही आनंद साजरा करत आहेत.
डेल स्टेनची भविष्यवाणी ठरली खरी! सिराजच्या कामगिरीनंतर सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या सुनील गावस्कर यांनी मैदानावर गाणी गाऊन आणि नाचून हा विजय साजरा केला. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मालिकेदरम्यान अनुभवी खेळाडू सुनील गावस्कर सोनी स्पोर्ट्ससाठी समालोचन करत होते. सामना संपल्यानंतर, तो केनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर त्याच्या संघासोबत नाचताना दिसला. यासोबतच तो ‘मेरे देश की धरती- सोना उगले-उगले हीरे मोती….मेरे देश की धरती…’ असे गाताना दिसला.
व्हिडिओमध्ये चेतेश्वर पुजारा देखील दिसत आहे, जरी तो फक्त गावस्करचा जयजयकार करताना दिसला. विजयाच्या वेळी सुनील गावस्कर त्याचे लकी जॅकेट घालून समालोचन करत होते. तो जिथे होता तिथे तो चाहत्यासारखा हा विजय साजरा करत होता. माजी खेळाडू असण्यासोबतच, दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर हे देखील भारतीय संघाचे मोठे चाहते आहेत.
Sunil Gavaskar sang it for all of us 🎶🇮🇳
Nothing lights up the little master like a #TeamIndia victory 😄 #SonySportsNetwork #ENGvIND #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings pic.twitter.com/KrNQXygjx8
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 4, 2025
जेव्हा जेव्हा टीम इंडिया मोठा सामना जिंकते तेव्हा गावस्कर मैदानावर या शैलीत आनंद साजरा करताना दिसतात. २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर गावस्कर यांनी मैदानावर नाचही केला होता. ओव्हल कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी पहिल्या तासात ४ विकेट घेत टीम इंडियाने ६ धावांनी विजय मिळवला. सामन्यात मोहम्मद सिराजने ९ विकेट घेतल्या तर प्रसिद्ध कृष्णाने ८ विकेट घेतल्या.