फोटो सौजन्य - Rajasthan Royals सोशल मीडिया
Vaibhav Suryavanshi Century : २८ एप्रिल हा वैभव सूर्यवंशीसाठी ऐतिहासिक दिवस आहे, त्याने त्याच्या करियरची सर्वात सुंदर इनिंग खेळली आहे. १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने त्याच्या करियरमधील सर्वात महत्वाचे त्याचबरोबर त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर इनिंग खेळली आहे. त्याने त्याचे अर्धशतक १७ चेंडूंमध्ये पूर्ण केले तर त्याने त्याचे आयपीएलमधील पहिले शतक फक्त ३५ चेंडूंमध्ये पूर्ण केले आणि सर्वात जलद गतीने शतक ठोकण्याच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आज ११ षटकार आणि ७ चौकार मारले. आजच्या सामन्यात त्याने एकही गुजरात टायटन्सच्या गोलंदाजाला सोडलं नाही.
आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाने पहिले फलंदाजी करून राजस्थान रॉयल्सविरुद्ध २०९ धावा केल्या होत्या. यामध्ये शुभमन गिल त्याचबरोबर जोस बटलर यांनी चांगली खेळी खेळली होती. त्यानंतर प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी संघासाठी गुजरातच्या गोलंदाजांना धुतलं. या काळात त्याने मोहम्मद सिराजपासून ते इशांत शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदरपर्यंत सर्वांच्या चेंडूंवर अनेक षटकार मारले. इशांतच्या एका षटकात वैभवने २६ धावा काढल्या. यामध्ये तीन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता.वैभव सूर्यवंशीची धोकादायक फलंदाजी पाहूनराजस्थानचे प्रशिक्षक राहुल द्रविड देखील खूप आनंदी दिसत होते.
Youngest to score a T20 1⃣0⃣0⃣ ✅
Fastest TATA IPL hundred by an Indian ✅
Second-fastest hundred in TATA IPL ✅Vaibhav Suryavanshi, TAKE. A. BOW 🙇 ✨
Updates ▶ https://t.co/HvqSuGgTlN#TATAIPL | #RRvGT | @rajasthanroyals pic.twitter.com/sn4HjurqR6
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2025
वैभव सूर्यवंशीच्या धोकादायक फलंदाजीचा अंदाज यावरून येतो की त्याने एकाही जीटी गोलंदाजाला सोडले नाही. त्याच्या खेळीदरम्यान, वैभवने या सामन्यात आयपीएल पदार्पण करणाऱ्या करीम जन्नतचा डावही खराब केला. करीम जन्नतच्या पहिल्याच षटकात त्याने ३० धावा काढल्या. वैभवच्या खेळीचा उत्साह इतका होता की आतापर्यंत व्हीलचेअरवर बसलेला राजस्थानचा प्रशिक्षक राहुल द्रविडही उभा राहिला. त्याने दोन्ही हात वर करून वैभवचे मनोबल वाढवले.
त्याने आज त्याच्या नावावर अनेक विक्रम केलं आहेत. पहिला विक्रम म्हणजेच जेव्हा त्याने राजस्थान रॉयल्ससाठी पदार्पण केले होते त्यादिवशी तो सर्वात तरुण आयपीएलमध्ये खेळणारा खेळाडू ठरला होता. त्याचबरोबर आज त्याने फक्त १७ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या आणि आयपीएल २०२५ मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठरला आहे यामध्ये पहिल्या स्थानावर क्रिस गेलं आहे.