Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs BAN: 11 तास, 30 विकेट्स… Mitchell Starc समोर बांग्लादेश गारद! दोन दिवसांतच खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा डावाने दणदणीत विजय

Aus Beat Ban in 2nd test in mackay: दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशला एक डाव आणि ५१ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने अवघ्या दोन दिवसांत सामना संपवला. या सामन्यात मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा नायक ठरला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 23, 2026 | 02:57 PM
Aus Beat Ban in 2nd test in mackay:

Aus Beat Ban in 2nd test in mackay:

Follow Us
Follow Us:
  • बांग्लादेशचा लाजिरवाणा पराभव
  • ऑस्ट्रेलियाने डाव आणि ५१ धावांनी उडवला धुव्वा
  • मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीसमोर बांग्लादेश गारद
ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना मॅके येथील ग्रेट बॅरियर रीफवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशला अवघ्या दोन दिवसांत पराभूत केले. दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघाने बांग्लादेशला एक डाव आणि ५१ धावांनी हरवले. यासह मालिका १-१ अशी बरोबरीत संपवली. आज या सामन्याचा दुसरा दिवस खेळला गेला. दुसरा दिवस पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. या सामन्याच्या पहिल्या दिवशी १८ विकेट पडले तर दुसऱ्या दिवशी एकूण १२ विकेट पडले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा नायक मिचेल स्टार्क होता. त्याने संपूर्ण सामन्यात १० विकेट घेतले.

IND vs SL Live: पडिक्कलची फिफ्टी, गिलनेही ठोकलं अर्धशतक! शतकी भागीदारीने श्रीलंकेची कोंडी; भारत १८० पार

मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीसमोर बांग्लादेश गारद

कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी त्याचा निर्णय योग्य ठरवला. बांग्लादेशचे फलंदाज मिचेल स्टार्कसमोर टिकू शकले नाहीत. स्टार्कने सुरुवातीलाच अवघ्या २२ चेंडूंमध्ये पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. पहिल्या डावात बांग्लादेशचा संघ केवळ ६४ धावांवर सर्वबाद झाला. स्टार्कने सर्वाधिक सहा विकेट घेत इतिहास रचला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने आठ विकेट्स गमावून १६५ धावा केल्या होत्या. बांग्लादेशच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली, पण ऑस्ट्रेलियन फलंदाजांना संघर्ष करावा लागला.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१० धावा केल्या

दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात बांग्लादेशच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला झटपट बाद केले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २१० धावा करून १४६ धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात सात विकेट्स घेणारा शोरिफुल इस्लाम हा बांग्लादेशचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या बांग्लादेशने लंच ब्रेक पर्यंत ३९ धावांत तीन विकेट्स गमावले होते.

सामन्यात ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

दुसऱ्या सत्रातही ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व कायम राहिले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बांग्लादेशच्या पाच फलंदाजांना बाद केले, ज्यापैकी कोणीही खेळपट्टीवर टिकू शकला नाही. अंतिम सत्रात, ऑस्ट्रेलियाने झटपट दोन विकेट घेऊन सामना आपल्या नावावर केला. बांग्लादेशचा संघ ९५ धावांवर सर्वबाद झाला आणि ५१ धावांनी मागे राहिला. ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि ५१ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. मिचेल स्टार्कनेही दुसऱ्या डावात चार विकेट घेत १० विकेट्स पूर्ण केले. पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्टार्कला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

IND vs SL: कुलदीपचा ‘गेम ओव्हर’ अन् सारांश जैनचा डेब्यू? टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठा बदल

Web Title: Aus vs ban 2nd test mitchell starc 10 wickets australia innings victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Australia Cricket Team
  • australia vs bangladesh
  • Mitchell Starc

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.