
AUS vs ENG, Ashes series 2025: Mitchell Starc breaks Wasim Akram's record! World record in tatters
Mitchell Starc sets world record : मिचेल स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. स्टार्क डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज बनला आहे. या खास बाबतीत, त्याने माजी पाकिस्तानी कर्णधार वसीम अक्रमला पिछाडीवर टाकले आहे. खरं तर, स्टार्क आणि अक्रम या दोघांनीही डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून प्रत्येकी ४१४ विकेट्स चटकावल्या आहेत. वसीम अक्रमने हा टप्पा गाठण्यासाठी १०४ कसोटी सामने खेळले आहेत. तर स्टार्कने फक्त १०२ सामन्यांमध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे.
हेही वाचा : मी जे पाहत आहे ते माझ्यासोबतही घडले…रोहित आणि विराटचे भविष्य कोण ठरवत आहे? हरभजन सिंहने काळं सत्य केलं उघड
पाकिस्तानी गोलंदाज वसीम अक्रमच्या कसोटी कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, त्याने १९८५ ते २००२ दरम्यान पाकिस्तानसाठी एकूण १०४ कसोटी सामने खेळलेले आहेत. या काळात त्याने १८१ डावांमध्ये २३.६२ च्या सरासरीने ४१४ विकेट्स काढल्या आहेत. अक्रमने पाच वेळा १० विकेट्स, २५ वेळा ५ विकेट्स आणि २० वेळा ४ विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. कसोटी सामन्यात त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ११९ धावांत ७ बळी घेणे ही राहिली आहे.
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा गोलंदाज मिचेल स्टार्कच्या कसोटी क्रिकेटमदये चांगली कामगिरी करत आहे. स्टार्क २०११ पासून आतापर्यंत म्हणजे चालू सामन्यापर्यंत त्याने ऑस्ट्रेलियासाठी १०२ कसोटी सामने खेळलेले आहेत. या काळात त्याने २६.५६ च्या सरासरीने ४१४ बळी टिपले आहेत. मिचेल स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये तीन वेळा १० बळी, १७ वेळा ५ बळी आणि २० वेळा ४ बळी घेण्याची किमया साधली आहे. एका डावात त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ५८ धावांत ७ बळी घेणे राहिली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी दिग्गज मुथय्या मुरलीधरनच्या नावे जमा आहे. त्याने १९९२ ते २०१० दरम्यान त्याच्या संघासाठी १३३ कसोटी सामने खेळले असून २२.७२ च्या सरासरीने २३० डावांत ८०० बळी घेण्याची असाधारण कामगिरी केली आहे.
इतकेच नाही तर मिचेल स्टार्क हा पिंक बॉल टेस्टमध्ये एका संघाविरुद्ध २० विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज बनला आहे. हे वृत्त लिहिताना, त्याने इंग्लंडविरुद्धच्या पिंक बॉल टेस्टमध्ये सहा डावांमध्ये २० बळी टिपले आहेत.
हेही वाचा : IND vs SA 2nd ODI : रायपूरच्या मैदानात काय घडलं? Virat Kohli च्या दिशेने चाहता आला धावत; Video Viral