
AUS vs ENG 2nd TEST: Matthew Hayden's reputation saved after saying he would walk around naked! Joe Root's century saved him; Special celebration
Matthew Hayden’s reaction to Joe Root’s century : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेमधील दूसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळला जात आहे. या सामन्यातील पहिला दिवस संपला असून टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने ९ बाद ३२५ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून जो रूटने शानदार नाबाद शतक झळकवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ६ विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यात खास आकर्षण ठरले ते म्हणजे जो रूटचे शतक. या शतकासह, रूटने मॅथ्यू हेडनच्या विधानाला खरे ठरवले की जर जो रूटने या अॅशेस मालिकेत शतक केले नाही तर तो नग्न होऊन मैदानात फिरणार. आता मात्र, रूटच्या शतकानंतर, हेडनच्या विनोदी टिप्पणीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा : Ashes series 2025 : अबब! मोठा अपघात टळला! कॅच घेताना दोन खेळाडूंची टक्कर; पहा VIDEO
इंग्लंडच्या अधिकृत एक्स अकाउंटकडून जो रूटचे विनोदी पद्धतीने अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांनी लिहिले की जो रूटला ऑस्ट्रेलियात १०० धावा पूर्ण करण्यासाठी बराच वेळ लागला असेल, परंतु त्यांनी त्याला मनापासून पाठिंबा दिला आहे. हेडनने शतकावर प्रतिक्रिया देत म्हटले की, रूटने १०, नंतर ५० आणि आता शेवटी १०० धावा केल्याचे पाहून तो आनंदी आहे. त्याने रूटला “लिटल रिपर” असे म्हटले आणि त्याच्या यशाचा आनंद घेण्यास सांगितले आहे.
यापूर्वी, यूट्यूबवरील “ऑल ओव्हर द क्रिकेट” पॉडकास्टवर बोलतान असताना हेडनने “ऑस्ट्रेलियातील मालिकेदरम्यान जर रूट शतक झळकावू शकला नाही तर मी एमसीजीभोवती नग्न फिरेन.” असे खळबळजनक विधान केले होते.
सर्वकालीन कसोटी धावा करणाऱ्यांच्या यादीमध्ये फक्त सचिन तेंडुलकर जो रूटच्या वर आहे. सचिन तेंडुलकरने निवृत्त घेतली आहे. त्याने १५,९२१ धावा केल्या आहेत. ता या धावा ३४ वर्षीय इंग्लंडच्या खेळाडूच्या आवाक्यात आहेत. सध्याच्या दौऱ्यापूर्वी, रूटने ऑस्ट्रेलियात १४ कसोटी सामन्यांमध्ये ३५.६८ च्या सरासरीने ८९२ धावा फटकावल्या होत्या.
🤳 (1) 𝗜𝗻𝗰𝗼𝗺𝗶𝗻𝗴 𝗺𝗲𝘀𝘀𝗮𝗴𝗲@HaydosTweets has something he’d like to say to Joe Root 😅 pic.twitter.com/0yPGk7JC5S — England Cricket (@englandcricket) December 4, 2025
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची अॅशेस कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून इंग्लंडने जो रूटच्या शतकाच्या जोरावर ९ बाद ३२५ धावा केल्या आहेत. दिवस-रात्र कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात जो रूटने शानदार शतक लगावून संघाला तारळे आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ६ विकेट्स घेतल्या आहेत.