ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड टेस्ट मॅच(फोटो-सोशल मीडिया)
AUS vs ENG TEST, Ashes series 2025 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस २०२५ मालिकेतील दुसरा सामना ब्रिस्बेनमधील गॅबा स्टेडियमवर गुलाबी चेंडूने खेळवण्यात येत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने जो रूटच्या नाबाद शतकाकीय जोरावर ९ बाद ३२५ धावांची मजल मारली आहे. या सामन्यात एक मोठा अपघात टळला आहे. कॅच घेताना दोन खेळाडूंची टक्कर झाली. यामध्ये कुणाला दुखापत झालेली नाही.
पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रामध्ये, गस एटकिन्सनच्या रूपात इंग्लंडने २६४ धावांवर आपली सहावी विकेट गमावली. एटकिन्सन मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर पुल शॉट घेण्याचा प्रयत्न करत असताना, चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या बाजूला लागला. विकेटकीपर अॅलेक्स केरी आणि स्लिप फिल्डर मार्नस लाबुशेन कॅच घेण्यासाठी चेंडू मागे धावले. दोघांनी देखील डायव्ह केले आणि टक्कर दिली, परंतु केरीने कॅच घेण्यात यश आले. या शानदार क्षेत्ररक्षणामुळे एचिन्सन ४ धावा काढून माघारी परतला.
ब्रिस्बेन कसोटीत सामन्यात मिचेल स्टार्कने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. पहिल्या दिवशी इंग्लंडच्या नऊ विकेट्समध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बाजवली. मिचेल स्टार्कने १९ षटकांत ७१ धावा देत एकूण ६ विकेट्स चटकावल्या. गुलाबी चेंडूच्या कसोटी क्रिकेटमध्ये हा त्याचा सहावा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम होता. कसोटी क्रिकेटमध्ये ही त्याची १८ वी पाच विकेट्स घेण्याची वेळ होती. हा विक्रम करणारा तो सहावा ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची अॅशेस कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळला जात आहे. या सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने जो रूटच्या शतकाच्या जोरावर ९ बाद ३२५ धावा केल्या आहेत. या सामन्यात जो रूटने शानदार शतक लगावून संघाला तारले आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ६ विकेट्स घेतल्या आहेत.






