फोटो सौजन्य : X
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनल सामना खेळवला जाणार आहे हा सामना 11 जूनपासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी सर्वच क्रिकेट चाहते सध्या प्रचंड उत्सुक आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजय मिळवून इतिहास रचण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साठी कसून प्रॅक्टिस करत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल चा सामना हा लॉर्ड्समध्ये खेळवला जाणार आहे.
रिंकु सिंहच्या साखरपुड्याला जेवणाच्या प्लेटची किंम्मत किती? ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
लॉर्ड्स मैदान हे एक ऐतिहासिक मैदान आहे. पण त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा प्लान हा लॉर्ड्स मैदानावर प्रॅक्टिस करण्याचा होता, पण त्यांना वृत्तांच्या माहितीनुसार असे सांगण्यात आले आहे की लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर प्रॅक्टिस करण्याची सहमती मिळाली नाही. वृत्तांच्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियाच्या संघाला सांगण्यात आले आहे की लॉर्ड्स मैदान हे सध्या प्रॅक्टिससाठी उपलब्ध नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघाला कोणत्या कारणांमुळे लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर परमिशन मिळाली नाही या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती आयसीसीने शेअर केली नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेसाठी भारताचा संघ सध्या लॉर्ड्स मैदानावर सराव करत आहे. फॉक्स क्रिकेटच्या एका रिपोर्ट दावा केला आहे की भारतीय संघ हा सध्या लॉर्ड्स मैदानावर सराव करत असल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला अनुमती देण्यात आली नाही. रिपोर्टच्या माहितीनुसार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना हा 11 जून रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर 20 जून रोजी भारताचा संघ हा लॉर्ड्स मैदानावर पहिला सामना खेळणार नाही हा सामना 10 जुलै रोजी प्लॉट्स मैदानावर खेळवला जाणार आहे असे सांगण्यात येत आहे .
पण अजूनपर्यंत या संदर्भात आयसीसीने त्याचबरोबर बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती शेअर केली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये प्रॅक्टिस सेशनसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाला परमिशन मिळाले नाही पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सराव करण्याची संधी लॉस मैदानावर मिळाली.
सराव करण्याची संधी मिळाल्याबद्दल पॅट कमिन्स म्हणाला की, “मला वाटते की आज सकाळी स्टेडियमचे हे सर्वोत्तम रूप आहे. इथे कोणीही नाही, जी खूप चांगली गोष्ट आहे. मला खात्री आहे की यावेळी ते खूप चांगले होईल.”