फोटो सौजन्य : X
रिंकु सिंह प्रिया सरोज साखरपुडा : रिंकु सिंग यांचा खासदार प्रिया सरोज हिच्यासोबत साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. रिंकू आणि प्रियाच्या कुटुंबाव्यतिरिक्त, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, डिंपल यादव, जया बच्चन, इकरा हसन, राम गोपाल यादव यांच्यासह अनेक मोठे नेते देखील या हाय प्रोफाइल कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. रिंग सेरेमनीनंतर दोघेही १८ नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहेत.
त्याच्या या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या कार्यक्रमाला बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेट आणि राजकीय सेलिब्रिटींनी हजेरी लावली. लखनौमधील द सेंट्रम फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये हा लग्न सोहळा पार पडला. आता रिंकु सिंह आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याच्या जेवणाची प्लेट किती रुपयांची होती या सध्या चर्चेचा विषय आहे.
“मुझे थप्पड़ मारना चाहिए था” कर्णधाराच्या अपशब्दावर शशांक सिंगने सोडले मौन
कुलदीप यादवचा साखरपुडा नुकताच हॉटेल सेंट्रममध्ये झाला. इंग्लंडला जाण्यापूर्वी कुलदीपने त्याची बालपणीची मैत्रीण वंशिकाशी साखरपुडा केला. कुटुंब आणि मित्रांसह या कार्यक्रमाला काही मोजकेच क्रिकेटपटू उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव त्यांच्या पत्नी डिंपल यादवसह या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
IND vs ENG : इंग्लंड लायन्सला भारताने 327 धावांवर रोखलं! खलील अहमदने केली कमाल
लखनऊमधील द सेंट्रम फाइव्ह स्टार हॉटेल हे महागड्या हॉटेल्सपैकी एक आहे. येथील जेवणाची किंमत खूप जास्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका प्लेटची सर्वात कमी किंमत ५०००-६००० रुपये आहे. आता यावरून अंदाज लावता लावला जाऊ शकतो की हे हॉटेल किती महाग आहे. या हॉटेलमध्ये येऊन जेवण खाणे हे सामान्य माणसासाठी स्वप्नच असू शकते असे म्हटले जात आहे.
खासदार प्रिया सरोज हिने सोशल मिडीयावर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये हे दोघही फारच सुंदर दिसत आहेत. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत, रिंकू आणि प्रिया यांनी हॉटेलमध्ये प्री-एंगेजमेंट शूट देखील केले. पांढऱ्या शेरवानीमध्ये रिंकू आणि फिकट गुलाबी लेहेंग्यात प्रिया सरोज एकमेकांचे हात धरून स्टेजवर पोहोचल्या आणि रितीरिवाजाप्रमाणे साखरपुड्याचे विधी पूर्ण झाले. दोन्ही बाजूंकडून सुमारे ३०० पाहुण्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.