फोटो सौजन्य : BCCI
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये 20 जूनपासुन मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताच्या संघासाठी इंग्लडचे मोठे आव्हान असणार आहे. भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियाच्या मालिका ऑक्टोंबरमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका खेळवल्या जाणार आहेत. आता भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये होणारा दुसरा सामना हा अरुण जेटली मैदानावर म्हणजेच दिल्लीला खेळायला जाणार आहे. हा सामना पहिले ईडन गार्डन्स म्हणजेच कोलकत्ता येथे खेळवला जाणार होता.
त्याचबरोबर भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये नोव्हेंबरमध्ये मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. आता या मालिकेच्या काही सामन्यांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये बदल करण्यात आला आहे हा सामना इडन गार्डनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे हा सामना याआधी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवला जाणार होता.
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेची सुरुवात ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या हेतूने होणार आहे. या मालिकेची सुरुवात ही २ ऑक्टोंबरपासून होणार आहे आणि हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ही मालिका दोन सामन्यांची असणार आहे तर दुसरा सामना हा दिल्लीच्या मैदानावर होणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ हा भारताविरुद्ध तीन वेगवेगळ्या ठिकाणी मालिका खेळणार आहे. यामध्ये दोन कसोटी सामने तीन वनडे आणि पाच t20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा आयोजन करण्यात आले आहे.
🚨 NEWS 🚨
BCCI announces updated venues for Team India (International home season) & South Africa A Tour of India.
Details 🔽 #TeamIndia | @IDFCFIRSTBank https://t.co/vaXuFZQDRA
— BCCI (@BCCI) June 9, 2025
बीसीसीआयने सांगितले आहे की चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमच्या आउटफील्ड आणि खेळपट्ट्यांचेही नूतनीकरण केले जात आहे, ज्यामुळे भारत महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला यांच्यातील मालिकेसाठी ठिकाण बदलण्यात आले आहे. भारताचा इंग्लड दौऱ्यापासुन नव्या रुपामध्ये पाहायला मिळणार आहे, भारताचा संघ आता कशी कामगिरी करेल हे पाहणे मनोरंजरक ठरेल. टीम इंडीया आता रोहित शर्माच्या निवृतीनंतर शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.