फोटो सौजन्य - X (Proteas Men)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व मिचेल मार्श करणार आहेत तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेंबा बवूमा करताना दिसणार आहे. एकदिवसीय मालिका १९ ऑगस्टपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना केर्न्समधील केघली स्टेडियमवर खेळला जाईल. एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा घोट्याच्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे.
कागिसो रबाडाला टी-२० मालिकेदरम्यान ही दुखापत झाली. मात्र, त्याच्या जागी खेळाडूची घोषणा अद्याप झालेली नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ असा विजय मिळवला होता. रबाडाने या मालिकेत पाच विकेट घेतल्या. आता त्याच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेचा संघ एकदिवसीय मालिकेत कशी कामगिरी करतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.
🚨Squad Update 🚨
Proteas Men’s fast bowler Kagiso Rabada has been ruled out of the three-match One-Day International (ODI) series against Australia due to inflammation of his right ankle.
The 30-year-old underwent a scan on Monday, which confirmed the extent of the injury. He… pic.twitter.com/8SYrKWMgHz
— Proteas Men (@ProteasMenCSA) August 19, 2025
रबाडाच्या एकदिवसीय सामन्यांच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने १०६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने २७.४५ च्या सरासरीने १६८ विकेट्स घेतल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी १६ धावांत ६ विकेट्स ही आहे. अशा परिस्थितीत, त्याला वगळणे दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही.
पहिल्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्नस लाबुशेन ऑस्ट्रेलियन संघात परतला आहे. आज दक्षिण आफ्रिकेसाठी दोन खेळाडू पदार्पण करत आहेत. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी डेवाल्ड ब्रेव्हिस आणि प्रेनेलन सुब्रायन यांना पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (विकेटकिपर), ॲलेक्स कॅरी, ॲरॉन हार्डी, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, जोश हेझलवुड
एडन मार्कराम (विकेटकिपर), रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, विआन मुल्डर, केशव महाराज, प्रिनेलन सुब्रेन, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी