Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs SL, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाला विजयाची गरज! श्रीलंकेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३० व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 16, 2026 | 07:09 PM
AUS vs SL, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाला विजयाची गरज! श्रीलंकेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 
Follow Us
Close
Follow Us:

AUS vs SL, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३० व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात घामसामान होणार आहे. पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात  श्रीलंका संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ प्रथम गोलंदाजी फलंदाजीला उतरेल. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार मिचेल मार्श संघात परतला आहे. त्यामुळे संघाला अधिक बळकटी मिळणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा ऑस्ट्रेलिया सध्या कठीण काळातून जात आहे. त्यांना आजच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया सध्या पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहेत आणि आजचा आणखी एक पराभव त्यांना बाद होण्याच्या उंबरठ्यावर ढकलू शकतो.

दुसरीकडे, सह-यजमान श्रीलंकेला आज सुपर ८ मध्ये आपले स्थान निश्चित करण्याची चांगली सुवर्णसंधी असणार आहे. त्यांच्या शक्यता स्पष्ट आहेत: जर त्यांनी आज विजय मिळवला तर ते सहा गुणांसह थेट सुपर ८ मध्ये पात्र ठरतील.

हेही वाचा : IND vs PAK, T20 World Cup : ‘गलत जगह U-turn…’, दिल्ली पोलिसांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली! पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका टॉस जिंकल्यानंतर म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. स्पर्धेतील सर्वात महत्त्वाच्या सामन्यांपैकी हा एक सामना आहे. आमच्या संघात एक बदल करण्यात अल आहे तो म्हणजे मिश्राऐवजी कुसल परेरा या सामन्यात खेळणार आहे.

तसेच, टॉस गमावणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार मिचेल मार्शने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,  “ठीक आहे, आज रात्री जायला तयार आहे. हा एक मोठा सामना आहे, प्रत्येक सामना मोठी जबाबदारी घेऊन येत असतो. गेल्या सामन्यात आम्ही आमच्या सर्वोत्तम कामगिरीत नव्हतो. मी, कूपर कॉनोली आणि झेवियर बार्टलेट खेळत आहोत.”

हेही वाचा : AFG vs UAE, T20 World Cup 2026 : रशीद खान टी-20 क्रिकेटचा बॉस! ‘हा’ भीम पराक्रम करत रचला खास इतिहास

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (डब्ल्यू), पवन रथनायके, दासुन शनाका (क), कामिंदू मेंडिस, दुशन हेमंथा, दुनिथ वेललागे, दुष्मंथा चमीरा, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन: मिचेल मार्श (क), ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस (डब्ल्यू), मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, कूपर कोनोली, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा

Web Title: Aus vs sl t20 world cup 2026 sri lanka win the toss and decide to bowl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • AUS vs SL
  • Dasun Shanaka
  • Mitchell Marsh
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Sports Crime News: क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर
1

Sports Crime News: क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.