दिल्ली पोलिसांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली(फोटो-सोशल मीडिया)
IND vs PAK, T20 World Cup : रविवारी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला, या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे, भारतीय चाहते हा विजय मोठ्या प्रमाणात साजरा करत आहेत. अशातच या आनंदापासून दिल्ली पोलिसा का लांब राहतील? त्याने देखील पाकिस्तानची खिल्ली उडवून आपला आनंद संजार केला. दिल्ली पोलिसांनी रस्ता सुरक्षेच्या बहाण्याने पाकिस्तानच्या पराभवाची खिल्ली उडवणारी पोस्ट केली आहे.
हेही वाचा :AFG vs UAE : अफगाणिस्तानच्या पदरात विश्वचषकाचा पहिला विजय! यूएईला 5 विकेट्सने केले पराभूत
१५ फेब्रुवारी २०२६ रोजी, आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकाच्या गट टप्प्यातील सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. सामन्यापूर्वी दोन्ही देशांमधील वातावरण खूपच तणावपूर्ण असल्याचे दिसून आले होते, परंतु भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच मैदानावर आपली आक्रमकता दाखवली. टीम इंडियाने दमदार कामगिरी करत सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. भारतीय गोलंदाजी आणि फलंदाजीपुढे पाकिस्तानी संघ संपूर्ण दबावाखाली असल्याचे दिसत होते.
भारताच्या शानदार विजयानंतर, दिल्ली पोलिसांकडून त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल ‘X’ वर एक मजेदार पोस्ट शेअर करण्यात आली. त्यांनी लिहिले की, “जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी यू-टर्न घेतला तर तुमचा अपमान होईल.”
त्यांनी या पोस्टसह #RoadSafety, #INDvsPAK आणि #T20WorldCup2026 सारखे हॅशटॅग देखील वापरल्याचे दिसत आहेत. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि चाहत्यांनी देखील या पोस्टला उत्साहाने प्रतिसाद दिला. लोक म्हणतात की दिल्ली पोलिसांनी रस्ता सुरक्षेचा संदेश दिला आणि एकाच पोस्टद्वारे प्रतिस्पर्धी संघावर टीका देखील केली
गलत जगह U-turn लोगे तो यूहीं मुंह की खाओगे#RoadSafety #INDvsPAK#T20WorldCup2026 pic.twitter.com/BqHkaMnSD7 — Delhi Police (@DelhiPolice) February 15, 2026
पाकिस्तानला धूळ चारण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. भारताच्या या विजयाचा खरा हिरो इशान किशन ठरला आहे. त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले. सामन्यानंतर, इशानने सांगितले की, सुरुवातीला विकेटवर फलंदाजी करणे अवघड होते. परंतु त्याला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. त्याने सांगितले की १६०-१७० धावांचे लक्ष्य त्याच्या समोर होते. जे एक आव्हानात्मक एकूण धावसंख्या ठरली. इशानने त्याच्या ऑफ-साईड खेळात त्याने केलेल्या कठोर परिश्रमाचा विशेषतः उल्लेख केला, ज्याचे या महत्त्वाच्या सामन्यात चीज झाले.
हेही वाचा :T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना पुन्हा होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी आणि कसे शक्य आहे?
गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी भारताच्या विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले. अमित शाह म्हणाले की फॉरमॅट, ठिकाणे आणि तारखा बदलतात, परंतु भारताची विजयी मालिका अबाधितच आहे.






