
AUS vs SL, T20 World Cup: Australia guard against Sri Lankan bowling! Shanaka Army set a target of 181 runs; Hemantha's penetrating bowling
AUS vs SL, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३० व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले आहेत. पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात टॉस गामावणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने कर्णधार मीचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडच्या अर्धशतकांच्या जोरावर २० ओव्हरमध्ये सर्वबाद १८१ धावा केल्या आहेत. श्रीलंकेला विजयासाठी १८२ धावा कराव्या लागणार आहेत.
पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ऑस्ट्रेलिया संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड या सलामी जोडीने ८.२ षटकांत १०० धावा केल्या. एक वेळ वाटत होते ऑस्ट्रेलिया २०० चा आकडा सहज पार करेल. परंतु २० षटकांत सर्वबाद १८१ धावांतच त्यांचा संघ बाद झाला.
मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड वगळता (आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६)इतर कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला आपली छाप पडता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने ५६ आणि मिचेल मार्शने ५४ धावा केल्या. तसेच, इंग्लिश आणि मॅक्सवेलने मधल्या फळीत भागीदारी करून संघाला १५० धावांच्या पुढे पोहचवले. इंग्लिश २७ धावांवर बाद झाला, तर मॅक्सवेल २२ धावांवर माघारी गेले. श्रीलंकेकडून दुशन हेमंथाने तीन आणि दुष्मंथा चामीराने दोन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा एकेकाळी शून्य विकेटवर १०४ धावसंख्या होती, परंतु नंतर संघ १८१ गारद झाला.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (डब्ल्यू), पवन रथनायके, दासुन शनाका (क), कामिंदू मेंडिस, दुशन हेमंथा, दुनिथ वेललागे, दुष्मंथा चमीरा, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन: मिचेल मार्श (क), ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस (डब्ल्यू), मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, कूपर कोनोली, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा