फोटो सौजन्य - आयसीसी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये कोलंबो येथे महिला विश्वचषकाचा सामना काल खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानला पराभूत करुन सलग तिसरा विश्वचषक 2025 चा विजय नावावर केला आहे. एक वेळ ऑस्ट्रेलियाचा संघ सामन्यामध्ये अडचणीत होता स्टार फलंदाज बेथ मुनीने शानदार शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानवर १०७ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. चालू विश्वचषकात पाकिस्तानचा हा सलग तिसरा पराभव होता.
मुनीने खालच्या फळीतील फलंदाज एलेना किंगसह संघाला संकटातून बाहेर काढले आणि उल्लेखनीय पुनरागमन केले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. फिरकी गोलंदाज नशरा संधू (३/३७) यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कहर केला आणि ऑस्ट्रेलियाचा वरचा क्रम उध्वस्त केला. २२ व्या षटकापर्यंत धावफलकावर फक्त ७६ धावांत सात विकेट होत्या.
१५० धावांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा पराभव होईल असे वाटत होते, पण मुनीने (११४ चेंडूत १०९ धावा) तिचे पाचवे एकदिवसीय शतक आणि तिचे पहिले विश्वचषक शतक झळकावून संघाला सावरले. तिने किंग (नाबाद ५१) सोबत नवव्या विकेटसाठी १०६ धावांची विक्रमी भागीदारी करून संघाला ९/२२१ पर्यंत पोहोचवले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. किम गार्थ (३/१४), अॅनेबल सदरलँड (२/१५) आणि मेगन शट (२/२५) यांच्या घातक गोलंदाजीमुळे पाकिस्तानला ३६.३ षटकांत फक्त ११४ धावांत गुंडाळण्यात आले. ऑस्ट्रेलियाचा हा स्पर्धेतील दुसरा विजय होता.
Beth Mooney, what a performance! 👏 Click here to watch her highlights 👉 https://t.co/cprGvrP4qn pic.twitter.com/tz5mSCZzyh — ICC (@ICC) October 9, 2025
पहिल्या सामन्यात त्यांनी न्यूझीलंडला हरवले, तर श्रीलंकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. नवव्या षटकापर्यंत त्यांनी ३१ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. वेगवान गोलंदाज किम गार्थ आणि मेगन शट यांनी अनुक्रमे तीन आणि दोन विकेट घेतल्या. संपूर्ण डावात फक्त चार पाकिस्तानी फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने मागील तीनही सामन्यांमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने तीनही सामन्यामध्ये विजय मिळवून गुणतालिकेमध्ये पहिले स्थान गाठले आहे.