
Australian Open 2026: Djokovic's reign is over! Carlos Alcaraz becomes the new 'king' by winning the Australian Open.
Carlos Alcaraz won the Australian Open title : स्पॅनिश युवा स्टार कार्लोस अल्काराझने २०२६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपली कमाल दाखवली. त्याने या स्पर्धेचे जेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. २२ वर्षे आणि २७२ दिवसांच्या वयात, त्याने अनुभवी नोवाक जोकोविचला पराभूत करून त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद जिंकले आहे. यावेळी मात्र जोकोविच त्याचे २५ वे ग्रँड स्लॅम जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असताना अल्काराझच्या आक्रमक आणि संयमी खेळण्याच्या शैलीने त्याचे प्रयत्न उधळून देत ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब जिंकला.
हेही वाचा : IND vs NZ 5Th 20I : अर्शदीप सिंगच्या 5 विकेट्सवर पडले विरजण; T20I इतिहासात नोंदवला लाजिरवाणा विक्रम
अल्काराझने या विजयासह कारकिर्दीतील ग्रँड स्लॅम पूर्ण करणारा सर्वात तरुण पुरुष खेळाडू बनला आहे. या कामगिरीसह, त्याने डॉन बजचा ८८ वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला आहे. स्पॅनिश खेळाडूने यापूर्वी फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपनमध्ये एकूण सहा ग्रँड स्लॅम जेतेपदे आपल्या नावे केले होते.
आजच्या या अंतिम सामन्यात अल्काराझने त्याच्या आक्रमक आणि बुद्धिमान रणनीतीने जोकोविचवर दबाव कायम ठेवण्यात यश मिळवले. त्याच्या फटक्यांची गती अफलातून होती. तसेच, त्याचे नेटवरील नियंत्रण आणि सामन्यातील महत्त्वाच्या क्षणी त्याची मानसिक शांतता यामुळे त्याच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. सामन्यानंतर, अल्काराजने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला हा त्याच्यासाठी स्वप्नातील विजय होता आणि टेनिस इतिहासावर त्याची छाप सोडणे हे त्याचे ध्येय नेहमीच राहिले आहे.
जोकोविचने पहिला सेट ६-२ असा जिंकत सामन्याची सुरुवात धडाक्यात केली. तथापि, अल्काराजच्या संयम आणि आक्रमक खेळामुळे दुसरा सेट ६-२ असा जिंकून सामना संपुष्टात आला. तिसरा सेट रोमांचक लढतीत रूपांतरित झालेला दिसून आला. अल्काराजची फिटनेस आणि वेग जोकोविचला आव्हान देत असल्याचे चित्र समोर दिसत होते. अल्काराजने तिसरा सेट जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले.
चौथ्या सेटमध्ये, दोन्ही खेळाडूंना त्यांची सर्व्हिस राखण्यासाठी संघर्ष करताना दिसले. सेटच्या शेवटी ५-५ असा सामना अत्यंत तणावपूर्ण झाला आणि टायब्रेकरच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला. शेवटी, अल्काराजने त्याची सर्व्हिस धरली आणि जोकोविचला धूळ चारत त्याच्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदावर नाव कोरले. या विजयासह, अल्काराजने एकूण सातवे ग्रँड स्लॅम जेतेपद आपल्या खात्यावर जमा केले.